बागलाण तालुक्यातील बिरसा फायटर्सचे दादाजी बागुल कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी घेतली विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांची भेट

 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰   


बागलाण तालुक्यातील बिरसा फायटर्सचे दादाजी बागुल कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी घेतली विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांची भेट




सन 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्यातील अनेक गावांमध्ये आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण वाढलेले असुनही आजपर्यंत तालुक्यातील पुर्व व उत्तर भागातील आदिवासींना पेसा अधिनियम 1996 मधील  आदिवासींचे हक्क व अधिकार यापासून आदिवासींना वंचित ठेवण्याचे षडयंत्र नेमके कोणाचे ?? असा प्रश्न निर्माण होतो. 

 म्हणून बागलाण तालुक्यातील पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या व नवीन ग्रामपंचायतींचा खासकरून पुर्व व उत्तर भागातील ग्रामपंचायतींचा नव्याने लोकसंख्येच्या आधारावर सर्व्हे करुन तालुक्यातील पेसा पुनर्रचना करण्यात यावी व येथील आदिवासींना न्याय मिळवून देण्यात यावा.

गेल्या 40 वर्षापासून बागलाण तालुक्यातील पुर्व व उत्तर भागातील आदिवासींवर अन्याय होत आहे.म्हणून सदर विषयावर लक्ष घालून बागलाण तालुक्यातील आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब स्वतः लक्ष्य देऊन पाठपुरावा करणार असल्याचे बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष दादाजी बागुल ,प्रविण पवार, हिरालाल गायकवाड, उमाकांत कापडणीस, सुभाष सोनवणे, विजय सहारे भाऊसाहेब माळी व अन्य पदाधिकारी यांना स्पष्ट केले.



साहेबांचे खूप खूप धन्यवाद 

जय आदिवासी

 जय बिरसा

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Post a Comment

0 Comments

झाले