सटाणा (नाशिक) : बागलाण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घातक स्वरुपाच्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. जातीय अत्याचार, महिला अत्याचार, चोरी आदी घटनांची संख्या तालुक्यात वाढली असून पोलीस प्रशासन नेमके करते काय ? हा विधायक प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहेत.
तालुक्यातील गुन्हेगारीने आता टोक गाठले असून गेल्या आठ दिवसातच लागोपाठ दोन संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनांनी नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन्ही संशयास्पद मृत्यूंमधील मृत व्यक्ती या आदिवासी समाजातील शेतमजुर (सालदार) असल्याने आदिवासी समाजावरील होणाऱ्या अत्याचारांप्रति शासन आणि पोलीस प्रशासन प्रचंड उदासीन असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये लखमापुर (बागलाण) गावातील काही लोकांनी केलेले अन्याय-अत्याचार, तळवाडे (मालेगांव) येथिल आदिवासी शेतमजुरांवर गावाने लादलेल्या जाचक अटींनी महाराष्ट्रभरात या तालुक्यांची प्रतिमा डागाळली असल्याने बागलाण तालुका, मालेगांव ग्रामीण उपविभाग पोलीस प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवले निघाले आहेत.
सटाणा पोलीस ठाण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. सुभाष अनमुलवार यांवर आहे. बागलाण तालुका हा मालेगाव ग्रामीण पोलीस उपविभागीय (DySP-SDPO) अधिकारी श्री. पुष्कराज सुर्यवंशी यांच्या कार्यक्षेत्र हद्दीत येतो, हा विभाग अपर जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. चंद्रकांत खांडवी यांच्या नियंत्रणाखाली असून जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकपदाची जबाबदारी श्री. सचिन पाटील यांच्यावर आहे. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी येथिल वाढत्या गुन्हेगारीकरणावर आळा घालावा अशी नागरीकांची रास्त अपेक्षा आहे.
वाढत्या चोरीच्या घटना, जातीय अत्याचार, घातपाताची वाढणारी संख्या यांमुळे पोलीस प्रशासनाची निष्क्रियता समोर आल्याने नाशिक परिक्षेत्राचे उप पोलिस महानिरिक्षकांनी यासंदर्भात योग्य ती पावले उचलायला हवीत तसेच, नाशिक ग्रामिणच्या पोलीस अधिक्षकांनीही अनु. जाती, अनु. जमाती यांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि असुरक्षितता संपविण्यासाठी योग्य कायदेशीर भूमिका घ्यायला अशी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ता, आदिवासी मित्र प्रा. अमोल बच्छाव यांनी केली आहे.
गुन्हेगारीने नागरीकांमध्ये वाढलेल्या असुरक्षिततेच्या भावना थोपविण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने, झालेल्या संशयास्पद मृत्यूंसाखळीचा योग्य छडा लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे अमोल बच्छाव यांनी सांगीतले आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार