आपल्या देशातील आदिवासी जमातींवरील अत्याचार अजूनही थांबलेले नाहीत हे लखमापुर (ता. बागलाण, जि. नाशिक) या गावातील घटनेने पुन्हा सिद्ध केले.

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




अमोल बाळासाहेब बच्छाव.

अमोल बाळासाहेब बच्छाव.

अमोल बाळासाहेब बच्छाव. सर यांनी लखमापुर येथे भेट दिली असता तेथील आदिवासी समाजाने आपल्या वर झालेला अन्याय बोलून दाखवला

आपल्या देशातील आदिवासी जमातींवरील अत्याचार अजूनही थांबलेले नाहीत हे लखमापुर (ता. बागलाण, जि. नाशिक) या गावातील घटनेने पुन्हा सिद्ध केले.

दि. १७ डिसेंबर २०२१ रोजी लखमापुर येथील गावकऱ्यांनी आदिवासी मजुरांच्या उदरनिर्वाहाच्या अधिकाराविरोधात एकतर्फी ठराव पास केला, यानुसार आदिवासी मजुरांनी दिवसभरासाठी केवळ २००/- (दोनशे रु. मात्र) इतक्या नाममात्र मजुरीवर गावातच मजुरी करावी, गावाबाहेर मजुरीस गेल्यास गावात राहू देणार नाही, रेशन पुरवणार नाही अशा धमक्यांसह ग्रामपंचायतीसमोर या महिला मजुर आणि त्यांच्यासमवेत असलेल्या लहान बालकांनाही अमानुष मारहाण केली.
काय होती ही अमानुषता हे जेव्हा मी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी पीडितांची भेट घेतली तेव्हा त्यांनी घडलेल्या घटनेचे अतिशय असाह्यपणे कथन केले.




अशा घटना संवैधानिकतेच्या विरोधात आहेत. शासन आणि प्रशासनाने याची गांभीर्यानेन दखल घेत. संबंधीत गावातील ग्रामसेवक, पोलीस पाटील यांसह दोषींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी !





लखमापुर (ता. बागलाण, जि. नाशिक) या गावातील कारगील वस्तीवरील आदिवासी मजुरांनी दुसऱ्या गावात मजुरीसाठी जाऊ नये असा फतवा या गावातील काही लोकांनी काढला, या आदिवासी महिला, मजुरांना, ग्रामपंचायतीसमोर मारहाण करण्यात आली. काय आहे हा प्रकार आपण त्यांच्याच तोडून ऐकुण घ्यायला हवा !





लखमापुर (ता. बागलाण, जि. नाशिक) येथिल आदिवासी मजुरांवरील अत्याचारांविरोधात मा. मानवाधिकार आयोग महाराष्ट्र राज्य, मा. मुख्यमंत्री कार्यालय, मा. जिल्हाधिकारी नाशिक, मा. पोलिस अधिक्षक नाशिक यांकडेही तक्रार दाखल केली आहे. यात संबंधीत गावाचे ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनाही दोषी जबाबदार समजले आहे. पोलीस प्रशासनाने योग्य त्या तरतुदींन्वये तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा पोलिसही तितकेच जबाबदार समण्यात येतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.




धन्यवाद अमोल बाळासाहेब बच्छाव. सर गरीब आदिवासीवर झालेला अन्याय तुम्ही जगासमोर आणला सर्व आदिवासी आपला खूप खूप आभारी आहे.





Post a Comment

1 Comments

  1. कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.....हे प्रकरण जागेवर थांबल तर हे लोक पुन्हा गरीब लोकांवर अन्याय अत्याचार करतील....

    ReplyDelete

जय आदिवासी
जय जोहार