आदिवासींनी सांस्कृतिक षडयंत्र ओळखायला शिकले पाहीजे; दशरथ मडावी

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Tribals-must-learn-to-recognize-cultural-conspiracies


✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल  मो-9307691872

यवतमाळ प्रतिनिधी:- दिवसें-दिवस आदिवासी समाज आपली संस्कृती विसरत चालला आहे. आदिवासी समाजाला आपल्या संस्कृतीची ओळख नसल्यामुळे तो इतरांच्या सांगण्याप्रमाणे वागत आहे.  हजारो वर्षापासून आदिवासींच्या संस्कृती विरोधात षडयंत्र रचले गेले. लिहिणारे तेच, सांगणारे तेच. कथा, प्रवचन, किर्तन करणारेही तेच. आम्ही फक्त ऐकायचे, माना डोलवायच्या त्यामुळे आमच्या नायकांना खलनायक करण्यात ते यशस्वी झाले. रामायण, महाभारत व इतर ब्राम्हणी ग्रंथात आदिवासी नायकांचा इतिहास भ्रष्ट, विकृत करण्यात आला. सम्राट राजा रावणाला खोटारड्या कथा जोडून बदनाम कण्यात आले. आज आपण या घटनांचे, पुराणकथांचे  विश्लेषण करायला शिकले पाहीजे. या कथें मागील सत्य शोधून विवेकवादी मांडणी केली पाहीजे. मग या कथांमध्ये दडलेल्या आपल्या मुळनिवासी आदिवासी संस्कृतीचा इतिहास शोधायला सोपे जाईल. रक्ष संस्कृतीच्या सर्व आदिवासी, बहुजनांनी यापुढे आपल्या महानायकांचा अपमान सहन करु नका. आपला इतिहास  कलंकित होऊ देऊ नका, सतत सजग रहा, सावध रहा, जागृत रहा. शोषितांकडे गमावण्यासारखे काहीही नसते. फक्त आज तुमच्याकडे तुमचा इतिहास आहे. तुम्ही याच पध्दतीने गप्प राहीला तर तोही चोरला जाईल, नष्ट केला जाईल. ज्यांचा इतिहास नष्ट किंवा विकृत केला जातो त्यांना कधीही गुलाम केले जाऊ शकते. म्हणुन आदिवासींनी आपल्या विरोधात होत असलेले सांस्कृतिक षडयंत्र ओळखायला शिकले पाहीजे. त्याचवेळी त्याचा आक्रमक होवून प्रतिकारही केला पाहीजे असे प्रतिपादन दशरथ मडावी यांनी केले.


Tribals-must-learn-to-recognize-cultural-conspiracies


बिरसा क्रांती दलाची जिल्हास्तरीय आढावा बैठक स्थानिक विश्राम भवन यवतमाळ येथे घेण्यात आली. बैठकीला रंगराव काळे प्रदेश अध्यक्ष, डी.बी.अंबुरे प्रदेश उपाध्यक्ष, किरण कुमरे प्रदेश महासचिव, नारायण पिलवंड प्रदेश प्रशिक्षक, प्रा.कैलास बोके विदर्भ सचिव, अतुल कोवे विदर्भ संघटक, रमेश भिसनकर जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते. तसेच बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. दशरथ मडावी साहेब यांच्या आदेशानुसार व प्रमुख उपस्थितीत बिरसा क्रांती दल यवतमाळ जिल्हा संघटक पदी मा. रामेश्वर ढगे यांची निवड करण्यात आली.



Tribals-must-learn-to-recognize-cultural-conspiracies


बैठकीला संजय मडावी, शरद चांदेकर, तुकाराम जुमनाके, नागोराव गेडाम, अजाब कोडापे, मेजर जीवन कोवे, हनुमंत पारधी, संगीत पवार, रामेश्वर ढगे, निलेश उकंडे, प्रतिक ठाकरे, शुभम चौधरी, सौरभ पंधरे, अजय ढंगारे, शरद मडावी, भोजराज दुम्हारे, निलेश बोडखे, गुरूदेव थोटे, सुमित खडके, प्रदिप डहाके, प्रतिक कुरसंगे, महीला फोरमच्या रेखा पोयाम, हिरा धुर्वे, विमल फोले, शारदा वानोळे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments

झाले