आदिवासींसाठी गावात दफनभूमी नसल्यामुळे ग्रामपंचायत समोरच दफनविधीसाठी खोदला खड्डा!




✍️मा. भारत बर्डे, एकलव्य संघटना युवा जिल्हाध्यक्ष जालना

औरंगाबाद प्रतिनिधी:- दि. 01/04/2022 वार शुक्रवार रोजी कन्नड तालुक्यातील रामनगर येथील छकुलीबाई रविंद्र माळी वय (20) वर्षे या आदिवासी भिल्ल महिलेचे निधन झाले मात्र या गावात स्मशान भूमीच्या जागेवरून वाद सुरु झाल्याने अंत्यसंस्कार कुठे करायचे असा प्रश्न पुढे आला. अखेर वेळ फार झाल्याने संतप्त मृताच्या नातेवाईकांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोरच दफनविधिसाठी खड्डा खोदल्याने गावात तणाव निर्माण झाला. अखेर पोलिस व महसुल अधिकारी यांच्या मध्यस्थीने अन्य मोकळ्या जागेवर या महिलेचे दफनविधी करण्यात आले.


यावेळी मा. पवनराजे सोनवणे साहेब (संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष एकलव्य संघटना), पिशोर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. कोमल शिंदे मॅडम, मा.भिकन पवार साहेब (ता.अध्यक्ष कन्नड ए.सं), रामनगर गावच्या सरपंच सौ.मिराताई माळी, मा.रमेश माळी, मा.रामहारी सोनवणे, गोकुळ माळी, विठ्ठल माळी, तसेच ग्रामस्त व मृत महिलेचे नातेवाईक तसेच मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.


आदिवासी समाज हा या देशाचा मुळ मालक आहे जल, जमीन, जंगल या नैसर्गिक साधन संपत्तीवर आदिवासींचा अधिकार आहे. असे असतांना आदिवासी समाजाला जिवंतपणी राहण्यासाठी जागा नाहीच आहे परंतु मेल्यानंतरही त्यांना दफनविधी करण्यासाठी भांडाव लागत आहे. यापेक्षा दुर्दैवी घटना आणखी काय असु शकते. इकडे आदिवासी समाज हा जागेसाठी भांडत आहे आणि तिकडे प्रशासन हा आमदारांना बंगले बांधुन देत आहे. आपण आता कुठपर्यंत अन्याय सहन करायच


आज जी स्थिती या गावाची आहे हिच स्थिती प्रत्येक गावाची आहे प्रत्येक गावात आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार वाढत चालला आहे. मित्रांनो डॅा. बाबासाहेबांच वाक्य आहे कि, "शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा" जोपर्यंत आपण एकत्र येत नाही. तोपर्यंत आदिवासी समाजावरील अन्याय दुर होणार नाही. जो व्यक्ती समाजासाठी काम करत आहे त्याला साथ द्या. जेणेकरून त्या व्यक्तिला समाजासाठी लढण्यास बळ येईल.

Post a Comment

0 Comments