आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना
| गोपाल गावित सर |
नंदुरबार दि.२४( प्रतिनिधी ) नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बिजादेवी केंद्र भादवड येथे विद्येची सरस्वती माता प्रतिमेचे पूजन व शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणाचे उद्घाटन भादवड केंद्राचे केंद्रप्रमुख जुबेर दादा तांबोळी तसेच बिजादेवी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. भादवड केंद्रातील मुख्याध्यापक व ५०% शिक्षक व ५०% शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
सदरील प्रशिक्षणास भादवड केंद्राचे केंद्रप्रमुख जुबेरदादा तांबोळी यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे महत्त्व, कर्तव्य व जबाबदारी यांची माहिती सविस्तर सांगितले विविध उदाहरणे देऊन उपयुक्त शैक्षणिक मार्गदर्शन केले. प्रशिक्षण सुलभक श्री गोविंद वाडीले, निदेश वळवी यांनी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण आदर्श शाळांमध्ये लोकसहभागातून शाळांचा विकास, शाळा व्यवस्थापन समितीच्या उत्कृष्ट नियोजन शाळांचा कायापालट करण्याचा आलेल्या विविध वाडी, वस्ती, पाड्यावरील विकास झालेल्या शाळांची विशेष माहिती देण्यात आली. सदरील प्रशिक्षण २३ मार्च २०२२ ते २४ मार्च २०२२ अखेर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले होते.
प्रशिक्षणार्थी यांना विविध खेळ, कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र पवार यांनी अल्पोपहार व चहाची नियोजन व्यवस्था केली. याप्रसंगी केंद्रातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, महिला सदस्या देखील उपस्थिती लक्षणीय होती. दोन दिवशीचे प्रशिक्षण उत्साहपूर्वक संपन्न झाले.



0 Comments
जय आदिवासी
जय जोहार