90 हजार शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी 15 मे पासून एस.सी.ई.आर.टी देणार प्रशिक्षण

आदिवासी युवा (Adiwasiyuva.com)




गोपाल गावित सर ( Gopal Gavit ), जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना 
मो.नं. 9527722072
गोपाल गावित सर







नंदुरबार. दि.18 सेवेची १२ व २४ वर्षे पूर्ण केलेल्या राज्यातील तब्बल ९० हजारांहून अधिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन आणि निवड श्रेणीसाठी १५ मेपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून ( एससीईआरटी ) प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण १४ जूनपर्यंत चालणार आहे. कोरोनामुळे शालेय शिक्षण विभागाकडून गत दोन वर्षांत निवड व वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षण आयोजित केले नव्हते. 


या प्रशिक्षणाची मागणी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी केली होती. या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला अशी प्रतिक्रिया शिक्षिका निधी जैन यांनी व्यक्त केली तर मिनल डिसोझा यांच्या मते प्रशिक्षण सुलभ व सोयीस्कर होण्यासाठी विभागवार केंद्र सुरू करण्यात यावे व त्यांच्या विकेंद्रीकरणाची मागणी केली. विजय महाजन यांनी शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या शिक्षकांच्या निवड व वरीष्ठ वेतनश्रेणीचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


Post a Comment

0 Comments

झाले