आदिवासी युवा
सटाणा ता.२१ :
तळवाडे (ता. मालेगांव) येथिल ग्रामपंचायतीने दि. १९ डिसेंबर रोजी असंवैधानिक ठरावपत्रक प्रसारित करत आदिवासी मजुरांविरोधात बेकायदेशीर अटी लागू केल्या होत्या त्याप्रमाणे दोनशे रुपये नाममात्र मजुरी, अकरा हजार दंड, बाहेरगावी मजुरीस बंदी, अर्धा दिवस भरल्यास मोबदला देण्यास नकार याबरोबरच हे अमानवी, जाचक नियम मोडल्यास सामाजिक बहिष्कार यांसारख्या अटी घालण्यात आल्या होत्या.
अशापद्धतीचे ठराव, अटी स्थानिक स्वराज्य संस्थांना बहाल केलेल्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असून त्याविरोधात वेळप्रसंगी मा. न्यायालयात धाव घेणार असण्याची भूमिका प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी घेतली होती.
संबंधीत ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी दूरध्वनिद्वारे चर्चा करुन त्यांना त्यांच्या चुकीविषयी समज देऊन ते ठरावपत्रक मागे घेऊन माफीनामा जाहिर करण्यास सांगीतले होते. त्यानुसार आज दि. २१ डिसें. २०२१ रोजी तळवाडे ग्रामपंचायतीने ग्रामसेवक आणि सरपंच यांसह पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या सहीनिशी जाहिर पत्रक काढून सदर माफिनामा पत्र आदिवासी मित्र, जनसेवक प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांकडे सादर केला.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार