बागलाण तालुकाध्यक्षपदी प्रविण पवार सर

 बागलाण तालुकाध्यक्षपदी प्रविण पवार सर 

बागलाण तालुकाध्यक्षपदी प्रविण पवार सर


 सटाणा : - बागलाण तालुक्यातील आदिवासी भिल समाज सेवा व बहुउद्देशीय संस्था बागलाण अध्यक्ष प्रवीण पवार सर व  युवक काँग्रेसचे बागलाण तालुका सरचिटणीस  यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या बागलाण तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . 

बागलाण तालुक्यातील सोमपुर येथील रहीवासी प्रविण पवार यांना नुकतेच पत्र देऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या बागलाण तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे महासचिव अनिलजी जाट , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व विरगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.अनिल पाटील यांचे या निवडी मध्ये विशेष मार्गदर्शन लाभले.

पवार यांच्या या निवडीबद्दल बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष व राष्ट्रीय जनक्रांती पार्टीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष दादाजी बागुल यांनी खूप खूप कौतुक केले व भरभरून शुभेच्छा दिल्या , 

बागलाण तालुकाध्यक्ष सुरेशजी कंकरेज , बागलाण काँग्रेस कमिटीचे सर्वच पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.

काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अपार मेहनत घेऊन बागलाण तालुक्यात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी व समस्या सोडवण्यासाठी नेहमीच महत्त्वाची भूमिका घेऊ असे पवार यांनी सांगितले . 

आदिवासी युवा

Post a Comment

0 Comments

झाले