बिरसा फायटर्सचे राज्यपाल महोदयांना साकडे भारतीय संविधानाच्या आदिवासी परंपरानुसार ग्रामसभा लावण्यात यावी

 बिरसा फायटर्स

बिरसा फायटर्सचे राज्यपाल महोदयांना साकडे भारतीय संविधानाच्या आदिवासी परंपरानुसार ग्रामसभा लावण्यात यावी
बिरसा फायटर्सचे राज्यपाल महोदयांना साकडे भारतीय संविधानाच्या आदिवासी परंपरानुसार ग्रामसभा लावण्यात यावी



सटाना.(नाशिक).भारताचे संविधानाच्या पाचव्या अनुसुची अंतर्गत येत असलेला आदिवासी विस्तार गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात यावी यासाठी बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष दादाजी बागुल , नाशिक जिल्हाउपाध्यक्ष हिरालाल गायकवाड , नाशिक जिल्हा महासचिव उमाकांत कापडणीस , जिल्हा संघटक भाऊसाहेब माळी तसेच गाव शाखा धांद्री येथील देविदास माळी, ज्ञानेश्वर शिंदे, दगा शिंदे, भाऊसाहेब पवार, रविंद्र माळी, शरद पवार यांनी बागलाण नायब तहसीलदार बहिरम साहेब यांच्या मार्फत राज्यपाल महोदयांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की, 

आदिवासी पारंपारिक , धांद्री ग्रामपंचायत तालुका : बागलाण जिल्हा : नाशिक , महाराष्ट्र हे गाव आदिवासी असुन भारताचे संविधानाच्या पाचव्या अनुसुची अंतर्गत येत आहे . 


1. पाचवी अनुसुची : आदिवासी विस्तारामधील जल , जंगल व जमिनीचे मालक आदिवासी आहेत आणी या गावात आदिवासी जनतेचे शासन राहील . 


2. अनुच्छेद 13 ( 3 ) ( क ) या गावात पारंपारीक ग्रामसभेचे कायदे , निर्णय लागु राहतील . या आदिवासी विस्तारामध्ये सामान्य कायदे लागू होणार नाही


 3. अनुच्छेद 19 ( 5 ) ( 6 ) अनुसुचित विस्तारामध्ये पारंपरिक ग्रामसभेच्या परवानगी शिवाय कोणतेही बिगर आदिवासी व्यक्ती प्रवेश करू शकनार नाही .


 4. वेदांता जजमेंट : अनुचित क्षेत्रात पारंपरिक ग्रामसभेच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे खणन होऊ शकनार नाही कारण या सर्व खाणींची मालकी ही आदिवासींची आहे . 


5. समता जजमेंट : अनुसुचित क्षेत्रातील आदिवासींची जमीन कोणीही गैरआदिवासी खरीदी करू शकणार नाही . 


6. अनुच्छेद 244 ( 1 ) : अनुसुचित क्षेत्रात आदिवासींचे प्रशासन आणि नियंत्रण राहील . 


7. अनुच्छेद 243 ( ब ) : अनुसूचित क्षेत्रामध्ये नगरपरिषद आणि नगरपालिका ह्या असंविधानिक आहेत . 


8. अनुच्छेद 243 ( 1 ) : पॅरा 5 ( क ) या अनुच्छेदाचे अनुपालन न करणारे देशद्रोही मानले जातील . 


9. अनुच्छेद 244 ( 1 ) : पॅरा 2 अनुसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या विभागातील स्थानिक नौकऱ्या 100 % आदिवासींसाठीच राखीव राहतील . 


वरील कलमांचे पालन होत नसल्याने म्हणुन आदिवासी परंपरानुसार ग्रामसभा लावण्यात यावी .



आदिवासी युवा 

खालील बातमी वाचा 👇👇👇



राज्यभरातील ताज्या घडामोडींसाठी आणि जाहिरातींसाठी व्हाट्सअप करा ⭕ 7350334020⭕






Post a Comment

0 Comments

झाले