बिरसा क्रांती दल शाखा नाशिकचे इगतपुरी तहसीलदारांना निवेदन





नाशिक.आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालय  नाशिक मार्फत न्यूक्लियस बजेट योजनेद्वारे सन 2021-22 मध्ये आदिवासींसाठी मोफत रेशन कार्ड व जातीचे दाखले देण्यात यावे यासाठी बिरसा क्रांती दल शाखा नाशिक तर्फे तहसीलदार साहेब परमेश्वर कासोळे इगतपुरी यांना नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील खराटे ,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष योगेश लहांगे ,नाशिक जिल्हा सचिव बाळा कचरे ,इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास लहांगे, इगतपुरी तालुका उपाध्यक्ष गणेश लांडे, नाशिक तालुकाध्यक्ष गणेश वारघडे, नाशिक तालुका सदस्य गणेश कचरे यांनी निवेदन दिले.



निवेदनामध्ये म्हटले आहे की, 

इगतपुरी तालुक्यातील आदिवासी समाज अजूनही अत्यंत मागासलेला आहे, स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही आदिवासींचा मुलभुत विकास देखील झालेला नाही ,दरवर्षी आदिवासींची कोटी कोटी रुपयांचे पँकेज शासनामार्फत घोषीत केले जातात. तरीही हा समाज मागासलेला कसा? आदिवासींच्या हक्काचा निधी जातो कुठे? असे प्रश्न साहजिकच समोर येतात.

नुकतीच आदिवासी विकास विभागामार्फत न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत शासनाने आदिवासींसाठी मोफत जातीचे दाखले व रेशन कार्ड मिळावेत अशी तरतूद केली आहे तरी आम्ही आपणास विनंती करतो की सदर योजनेचा लाभ आपल्या इगतपुरी तालुक्यातील प्रत्येक वंचित आदिवासींना मिळावा त्यासाठी आपल्या मार्फत गावागावात जातीचे दाखले व रेशन कार्ड वाटप करण्यासाठी कॅम्प लावण्यात यावेत. 

यासाठी आम्ही व आमची संघटना आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध राहू. त्यासाठी सदर योजना तालुक्यातील प्रत्येक गावागावात व आदिवासींपर्यंत पोचविण्यासाठी आमची संघटना सहकार्य करेल. 

जेणेकरून एकही आदिवासी या योजनेपासून वंचित राहणार नाही म्हणून सदर योजनेचे सर्वेक्षण आमच्या  संघटने मार्फत राबविण्यात यावे.



Post a Comment

0 Comments

झाले