"आदिवासी एकता परिषद व आदिवासी एकलव्य संघटनेचे निवेदन"
नंदुरबार : प्राथमिक शाळा, खासगी शाळा आणि शासकीय आश्रमशाळेत नवीन मुलांचे नाव दाखल करताना सक्तीने धर्म कॉलममध्ये हिंदू व मातृभाषा कॉलममध्ये मातृभाषा न लिहिता राज्यभाषा लिहिले जाते.
सर्वोच्च न्यायालयात वेळोवेळी 'आदिवासी हा हिंदू नाही' असे म्हटले असल्याने आदिवासींचे दाखले देताना धर्माच्या ठिकाणी आदिवासी अशी नोंद व्हावी, अशी मागणी आदिवासी एकता परिषद व आदिवासी एकलव्य संघटनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संविधानात पाचव-सहाव्या अनुसूचीमध्ये आदिवासींना आपल्या अस्तित्व, अस्मितेबाबत विशेष तरतूद केलेली आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनादेखील आदिवासींसाठी विशेष अधिकार दिलेले आहे. ज्यात आदिवासी अस्तित्व, अस्मिता जतनविषयी नमूद केलेले आहे. असे असताना शाळेत मुलांचे नाव दाखल करताना जिल्हा परिषद, खासगी शाळा, शासकीय आश्रमशाळांमध्ये सक्तीने 'हिंदू' असे नमूद केले जाते, हे संविधानविरोधी आहे.
ग्रामीण भागात पालकांना न विचारता शिक्षक आपल्या मर्जीप्रमाणे माहिती भरून घेतात व या कागदांवर पालकांना माहिती न देता अंगठा लावून घेतला जातो.
एकीकडे शासन आदिवासी अस्मिता,अस्तित्व, आत्मसन्मान आदिवासी जतन संवर्धनाची कायदे केली म्हणता आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी अस्तित्वावर छुपे घाव करता?
हा प्रकार आदिवासी आता खपवून घेणार नाहीत. निवेदन देताना आदिवासी एकता परिषदेचे कवी संतोष पावरा, योगेश पवार, आकाश मोरे, दीपक मगरे, रोखठोक बेधडक संघाचे प्रमोद गायकवाड, आदिवासी एकलव्य संघटनेचे अॅड. शीतल गायकवाड, अॅड. विजय नाईक, अॅड.जयकुमार पवार, ॲड.सुया गावीत, अॅड.अक्षय सोनी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अन्यथा आंदोलनाचा इशारा
शासनाच्या वतीने प्रत्येक शासकीय, खासगी शाळेची चौकशी केली जावी, सक्तीने आदिवासींची खोटी माहिती भरू नये, आदिवासी हिंदू नाही. अशाप्रकारची माहिती शाळेने भरू नये, असा आदेश काढण्यात यावा अन्यथा आदिवासी संघटना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल,
असे आदिवासी एकता परिषद व आदिवासी एकलव्य संघटनेमार्फत जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्यामार्फत केंद्रीय शिक्षणमंत्री, शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य,आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, शिक्षणाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले.
बातमी संदर्भ:- लोकमत
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆
_जाहिराती साठी संपर्क साधा_
+917350334020
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार