धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदिवासी गुणवंत शिक्षकांचे सत्कार

 




सटाणा प्रतिनिधी दादाजी बागुल: 21/09 शिक्षण व्यवस्थेतील अडचणींवर मात करून सटाणा' व देवळा तालूक्यातील शिक्षणक्षेत्रात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या शिक्षकांना गुणवंत शिक्षक सन्मान केल्यामुळे सटाणा येतील कंसरा कॉलनीत मुख्याध्यापक श्री दिपक ठाकरे तसेच श्री. भारत पवार , प्रदिप राऊत कैलास चौरे , हिराजी गवळी , संतोष ठाकरे - इ. शिक्षकांचे आदिवासी एकताच्या वतीने सत्कार करण्यात आले.

अध्यक्ष स्थानी निवृत्त अधिकारी श्री पंडीत ठाकरे होते . 

आजचे शिक्षक हे उद्याची पिढी घडवत असतात अशा कार्यक्षेत्रात कामे करणाऱ्या आदिवासी शिक्षकांकडून मोलाचे कार्य होत आहे याचे सर्व आदिवासी बांधवाना आभिमान आहे

अशीच एकता व कार्याची ऊर्जा असेल तर आपले आदिवासी प्रत्येक कार्यक्षेत्रात गुणवंत होतील असे जि . प . सदस्य गणेश अहिरे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना सांगितल. 

तरूणांनी एकत्र आले पाहिजे आदिवासी एकता मधून आदिवासींच्या अडचणी दुर केल्या पाहिजेत असे विस्ताराधिकारी सुर्यवंशी साहेब यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी कोल्हे सर यांनी केले तर पोपट पवार यांनी कार्यक्रम घडवून आणणारे तरूण मित्रमंडळ व उपस्थितांचे आधार मानले.


आदिवासी युवा

⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆

_जाहिराती साठी संपर्क साधा_

  +91 7350334020

⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆


Post a Comment

0 Comments

झाले