महाराष्ट्र राज्यातील आदिवासीअनुसूचित जमातीच्या उमेदवारांना एक वर्ष कालावधी साठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
योजनेचे नाव : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना एक
वर्ष कालावधी मध्ये नामवंत
खाजगी शिक्षण संस्थेच्या साह्याने ऑनलाईन स्वरुपात टॅबच्या माध्यमाने UPSC /
MPSC स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणे
योजना
योजनेचा उद्देश व स्वरूप :
महाराष्ट्र राज्यामध्ये
कोविड- १९ या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव असल्याने सध्या सर्व शाळा, महाविद्यालयातील
प्रशिक्षण तसेच शिक्षण संस्थेतील सुरु असलेले सर्व कामकाज स्थगित आहे. परंतू संघ व
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत कोविड पूर्व प्रकाशित झालेल्या नोकरी विषयक
जाहिरातीच्या अनुषंगाने विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जात आहेत. या
पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे (उमेदवारांचे ) शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सदर
कालावधीमध्ये (फक्त १ वर्ष करीता ) महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांना टॅब द्वारे ऑनलाईन स्वरुपात स्पर्धा परीक्षा मार्गदशन केले
जाणार आहे.
विद्यार्थी निवड प्रक्रिया :
आदिवासी विकास विभाग अंतर्गत
कार्यरत असलेल्या खाली नमूद अपर आयुक्त, आदिवासी विकास कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी
असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल.
एकूण चार अपर आयुक्त कार्यालयाच्या
स्तरावर एकूण २०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
निवड यादी तयार करणेसाठी
उमेदवारांच्या प्राप्त गुणांना खालीलप्रमाणे भारांक (Weightage)
दिले जाईल.
सदर योजनेचा आढावा
घेण्यासाठी व अंमलबजावणी त काही अडचणी आल्यास उचित बदल करून त्यास मान्यता
देण्याचे अंतिम अधिकार मा. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांना असतील.
उमेदवाराची सर्व साधारण
पात्रता:
· उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी /अधिवासी असला
पाहिजे.
· उमेदवाराची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित
जमातीच्या यादी मधील असणे आवश्यक
· प्रशिक्षणासाठी उमेदवाराकडे अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र
असणे बंधनकारक आहे.
· उमेदवारांच्या कुटुंबाचे सन २०२० -२१ या आर्थिक वर्षाचे
उत्त्पन्न रु. ८ लक्ष पेक्षा कमी असावे
· प्रशिक्षणासाठी निवड करण्यासाठी उमेदवाराने अरेरावी, राजकीय व नोकरशाही दबावतंत्राचा वापर केल्यास त्याची
उमेदवारी रद्द होईल.
· विद्यार्थ्याने खोटे कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ घेतला
असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेकडून संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च वसूल करून
कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
·
दिव्यांग
व्यक्ती आणि महिला यांच्यासाठी नियमानुसार आरक्षण देण्यात येईल.
अर्जासोबत जोडावयाची
कागदपत्रे पुढीलप्रमाणे :-
कागदपत्राची यादी :
१. विहित नमुना मध्ये संपूर्ण भरलेला अर्ज, त्यावर रंगीत सध्याचा फोटो असावा. [अर्जाचा नमूना]
२. अनुसूचित जमातीचे
प्रमाणपत्र साक्षांकित प्रत
३. अनुसूचित जमातीचे वैधता
प्रमाणपत्र साक्षांकित प्रत
४. दहावी (S.S.C.)
गुण पत्र व प्रमाणपत्र साक्षांकित प्रत
५. बारावी (H.S.C.)
गुण पत्र व प्रमाणपत्र साक्षांकित प्रत
६. पदवी (Degree)
गुण पत्र व प्रमाणपत्र साक्षांकित प्रत
७. पदव्युत्तर पदवी (Post
Graduation Degree) गुण पत्र व प्रमाणपत्र
साक्षांकित प्रत
८. डोमिसाईल प्रमाणपत्र
साक्षांकित प्रत
९. आधारकार्ड साक्षांकित
प्रत
१०. तहसीलदार यांनी दिलेला
सेतू उत्त्पन्नाचा दाखला
योजनेसाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सबंधित शासन निर्णय व
अर्जाचा नमुना www.trti.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरून डाऊनलोड करून वर नमूद सर्व कागदपत्रांसोबत
अर्ज पूर्ण भरून अर्जासोबत सर्व कागदपत्राची स्कॅन प्रत दिनांक ३०.०९.२०२१ पर्यंत trg.trti-mh@nic.in
या इ - मेल वर पाठवावी.
अधिक माहिती साठी www.trti.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆
_जाहिराती साठी संपर्क साधा_
+91 7350334020
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार