धांद्री बागलाण तालुका नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालय सरपंच , उपसरपंच , व सदस्यांनी कार्यालयास कुलूप ठोकले.

आज दि . २३ / ० ९ / २०२१ रोजी गुरुवार धांद्री बागलाण तालुका नाशिक जिल्ह्यातील  ग्रामपंचायत कार्यालय सरपंच, उपसरपंच, व सदस्यांनी कार्यालयास कुलूप ठोकले.



प्रतिनिधि नाशिक दादाजी बागुल -- कारणे पुढीलप्रमाणे : ग्रामसेवक सूर्यवंशी हे अतिशय मुजोरीने , अडेल तटू ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच , व सदस्यांना न जुमानता विश्वासात न घेता मनमानी कारभार चालवतात. ग्रामस्थही त्रस्त आहेत.

वरील बाबतीत गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे लेखी तक्रारी केली होती व त्यानुसार त्यांनी पंचायत समिती बागलाण येथे ग्रामपंचायत चौकशीचे आदेश देण्यात आले होते , परंतु त्यांनी कुठलीही चौकशी न करता दि .२१ / ० ९ / २०२१ रोजी श्री.व्ही.पी.सूर्यवंशी यांनी १ महिन्या करिता रजा टाकून ग्रामपंचायत व प्रशासनाचा विश्वास घात केलेला आहे.

कारण २१/०८/२०२१ पासून ते २१ / ० ९ / २०२१ पर्यंत धांद्री ग्रामपंचायत मध्ये हजर न राहता प्रशासनाची व धांद्री ग्रामस्थांची दिशा भूल करून २१ / ० ९ / २०२१ रोजी परस्पर गटविकास अधिकारी पंचायत समिती बागलाण यांच्याकडे रजेचा अर्ज देवून रजेवर गेले , परंतु विस्तार अधिकारी पाटील साहेब साटे लोटे मुळे त्यांची चौकशी न करता त्यांचा रजेचा अर्ज मंजूर करून उपमुख्यकार्यकारी अधिकारी नाशिक यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली . 

व या आधी अनेकदा ग्रामसेवक रजेवर जाऊन तात्पुरते ग्रामसेवक त्यांनी सूर्यवंशी यांच्याकडे ग्रामपंचायत दप्तराची मागणी केल्यास सदर ग्रामसेवक हे कार्यालयात हजर होऊन यावरून असे सिद्ध होते की , आमच्या ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.

असे निदर्शनास येते म्हणून त्यांची कायमस्वरूपी बदली जो पर्यंत होत नाही व आमच्या ग्रामपंचायत मध्ये रुजू झाल्या पासून ते आज पावेतो चौकशी करण्यात यावी, मिटिंग वेळी कोऱ्या रजिस्टर सदस्यांचा सह्या करून नंतर काहीही ठराव लिहिले जातात काय लिहिलेले वाचन करत नाही.

ग्रामपंचायत सरपंचाचे अधिकार स्वत : पाहत आहेत हे निदर्शनास आलेले आहे.त्याची चौकशी करावी . 

उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही ओडिट न करता त्यांना रजेवर पाठवले म्हणून आमच्या तक्रारींचे निराकरण होत नसल्याने आम्ही सरपंच , उपसरपंच , सदस्यांनी व ग्रामस्थांनी ग्रा.प. कार्यालयास कुलूप ठोकले व सदर ग्रामसेवकांची ओडिट व बदली होत नाही.तो पर्यंत कार्यालयास कुलूप राहील .

Post a Comment

0 Comments

झाले