ट्रायबल फोरमने केली सविस्तर चर्चा.
आदिवासी विकास विभागाचे सचिव मा.अनुपकुमार यादव यांची ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड.प्रमोद घोडाम यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने भेट घेतली.
यावेळी खालील प्रत्येक समस्यांवर सकारात्मक सविस्तर चर्चा करुन निवेदन देण्यात आले. समस्या निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी सचिवांनी शिष्टमंडळाला दिले आहेत .
१) आदिवासी उमेदवारांची विशेष भरती मोहीम सुरु करण्यात यावी.
२) पेसा क्षेत्राची पुनर्रचना करण्यात यावी.
३) आदिवासींना कसत असलेल्या वनजमिनीचा ताबा देण्यात यावा.
४) शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सन २०१५ पासून म्रुत्युची झालेल्या विद्यार्थ्यांच्या चौकशी करीता उच्चस्तरीय समितीची नेमणूक करण्याबाबत.
५)आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व शिष्यवृत्ती करीता पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याबाबत.
६) श्री.चंद्रभान परातें यांचेवर बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करण्याबाबत.
७) राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या पदासाठी आदिवासी उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीत ५ सेमी.ची उंचीत सूट मिळण्याबाबत.
याप्रसंगी शिष्टमंडळात कासम सुरत्ने ,इमाम केदार, दिलीप आंबवणे,प्रफुल कोवे,रोहित सुपे,विक्रम हेमाडे, मारुती खामकर,नितीन ठाकरे आदि उपस्थित होते.
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆
_जाहिराती साठी संपर्क साधा_
+91 7350334020
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆


0 Comments
जय आदिवासी
जय जोहार