बिरसा क्रांती दल संघटनेच्या दिंडोरी तालुका उपाध्यक्ष पदी मा.शंकर भाऊ वासले, संघटक. मा.रवी गायकवाड व त्र्यंबकेश्वर तालुका उपाध्यक्ष मा.रमेश जाधव यांची निवड



नाशिक जिल्हा प्रतिनिधी : दादाजी बागुल सर बागलाण 





नाशिक जिल्हा वार्ताहर-आदिवासी समाजाच्या सर्वांगीण, प्रगतीसाठी आत्मसन्मानासाठी, अस्तित्व,अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त,शिक्षण, संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या संघटनेची निर्मिती झाली आहे.

या संघटनेच्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका उपाध्यक्ष पदी मा.शंकर वासले व संघटक पदी मा. रवी गायकवाड, त्र्यंबकेश्वर तालुका उपाध्यक्ष मा. रमेश जाधव यांची निवड आज दि.24-09-2021 रोजी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा दसरथ मडावी साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

यावेळी online उपस्थित, बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.रंगरावजी काळे साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.डी.बी.अंबुरे सर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.विजय आढारी साहेब. महाराष्ट्र राज्य सचिव मा.चिंधू आढळ साहेब, नाशिक जिल्हा अध्यक्ष मा.सुनिल खराटे, उपाध्यक्ष मा. किशोर माळी, उपाध्यक्ष,योगेश लहांगे, 

जिल्हा सचिव बाळू कचरे,इगतपुरी तालुका अध्यक्ष मा. रामदास लहांगे, उपाध्यक्ष मा.गणेश लांडे, दिंडोरी तालुका अध्यक्ष मा.अशोक जाधव,पेठ तालुका अध्यक्ष मा.मधुकर पाडवी, येवला तालुका अध्यक्ष मा.विजय माळी, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष मा.युवराज गारे, नाशिक तालुका अध्यक्ष मा.गणेश वारघडे उपाध्यक्ष मा.सनि पावडे सचिव मा.रविभाऊ निबेंकर, 

संपर्क प्रमुख मा.भोला भालिंगे, विकास घोटे, रवि वाघ, संघटक मा. नामदेव झोंबाड, संदिप लहांगे उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा प्रसिद्ध प्रमुख मा.भिमराव जाधव, किरण लहांगे, योगिराज भांगरे, मा.दादाजी बागुल सर बागलाण तालुका आदि उपस्थित होते.

तसेच या निवडीचे श्रेय नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मा.योगेश लहांगे जिल्हा सचिव मा.बाळा कचरे, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष मा.युवराज गारे, महाराष्ट्र राज्य सचिव मा. चिंधू आढळ यांना जाते.

तसेच दिंडोरी तालुक्यातून व त्र्यंबकेश्वर तालुक्यातून वासले, गायकवाड व जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




आदिवासी युवा

⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆

_जाहिराती साठी संपर्क साधा_

  +91 7350334020

⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆



Post a Comment

0 Comments

झाले