अंतापुर गावातील सोनवणे बंधूंची सायकलिंग स्पर्धेत यशपूर्ण भरारी......
योगेश सोनवणे 14 वर्षाच्या च्या आतील 15 की.मी. (प्रथम)
तर
भरत सोनवणे (होमगार्ड) खुल्या वयोगटातील 25 की.मी. (द्वितीय)
आजच्या स्पर्धेचे यश त्यांच्या जवळ असलेली जुनी सायकल आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व स्पर्धकां जवळ उत्तम आणि चांगल्या दर्जाच्या सायकली तरीही दोघा भावांनी न डगमगता आपले कष्ट पणाला लावले...
मित्रांनो आज बागलान तालुक्यासाठी तसेच नाशिक जिल्ह्यासाठी अतिशय यश पूर्ण बातमी म्हणजे योगेश सोनवणे हा विद्यार्थी इयत्ता नववीत जनता विद्यालय अंतापुर येथे शिकत आहे.....🚲
आणि आनंदाची अशी मोठी बातमी आहे की तो आज महाराष्ट्राच्या टीम मध्ये त्याची निवड झालेली आहे...
आज महाराष्ट्रातील पुणे येथे या विद्यार्थ्याने आपले सर्वस्व पणाला लावून महाराष्ट्रातील खेळाडूंमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे.
त्याच प्रमाणे त्याची महाराष्ट्राच्या टीम मध्ये इतक्या कमी वयात त्याची निवड झालेली आहे...
आणि दुसरे बंधू भरत सोनवणे योगेश चे थोरले बंधू छोट्या बंधू ला उत्तम असे खेळाचे पाठ देऊन आपल्या लहान भावाला तर मोठे केले परंतु स्वतः सुद्धा आज महाराष्ट्राच्या टीममध्ये त्यांनी त्यांचे सुद्धा दुसरे स्थान त्यांच्या वयोगटातून मिळवलेले आहे किती गुणवंत विद्यार्थी आहेत, परिस्थिती जरी हलाखीची आहे, परंतु गुणांना कमी नाहीत आणि आज हेच त्यांनी दोघांनी दर्शून दिले......
हे विद्यार्थी अतिशय गरीब, सायकल घेण्याची परिस्थिती नाही,भरपूर साऱ्या मित्रांनी त्याना मदत केलेली आहे आणि त्यानी त्यांचा परिस्थितीवर मात करून थोड्याफार पैशावर ते पुण्यापर्यंत पोहोचले, पुण्यापर्यंत जाऊन त्यांनी आज आपल्या शाळेचा, बागलाण तालुक्याचा तसेच नाशिक जिल्ह्याला नावलौकिक प्राप्त करून दिला आहे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आम्ही सर्व शिक्षक त्याच्या या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन करीत आहोत. योगेश तू अशीच उंच भरारी मारत पुढे जात रहा,परिस्थितीशी झगडत राहा परंतु मागे पाहू नकोस तुझ्या मागे सर्व शिक्षकांचे अंतापुर गावातील रहिवाशांचे सर्वांचे आशीर्वाद आहेत....
काही दिवसापूर्वी या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मदतिचा हात भरुप्र नागरिकांनी दिला
आणि काही मित्रांनी त्यासाठी त्याला मदतही केली बागलाण तालुक्यातील पोलीस दलातील काही दानशूर कर्मचारी तसे च अधिकारी लोकांनी सुद्धा त्याला मदत केली....
जेमतेम पन्नास हजाराचा आजूबाजूला रक्कम जमा झाली असेल परंतु आजही त्याच्या कडे एक लाख रुपये किंमतीची सायकल घेण्यासाठी परिस्थिती नाही मित्रांनो हे दोघे भाऊ खूप कष्ट करनारे आहेत,परंतु त्याच्या जवळ पैसा नसल्यामुळे ते जास्त पुढे पर्यंत जाऊ शकत नाही....
......आपली मदत मिळेल अशी अपेक्षा करतो .....
एक हाथ 🤝🏻 मदतीचा.....
योगेश आणि भरत साठी आपली मदत खूप महत्त्वाची ठरेल एका गरीब कुटुंबाला पुढे आणण्यासाठी आपण ही मदत करण्याचा प्रयत्न करावा हीच आपणास विनंती करीत आहे...



0 Comments
जय आदिवासी
जय जोहार