प्रतिनिधी नाशिक जिल्हा दादाजी बागुल : आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी लहांगेवाडीची मुख्य ग्रामपंचायत वाडीवर्हे यांनी आदिवासी बहुल भागातील जनतेला कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही.
म्हणून बिरसा क्रांती दल यांनी पुढाकार घेऊन सहकार्य करत वाडीवर्हे येथिल ग्रामपंचायत पोलिस ठाणे व विद्युत सब डिव्हिजन यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की,
येथे 100% टक्के आदिवासी राहत आहे तरी ग्रामपंचायत च्या सुविधा एकही उपलब्ध होत नाही येथे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे.
तसेच
1) लहांगेवाडी येथे घंटागाडी उपलब्ध करुन देणे
2)इलेकट्रीक पोल बदलणे.
3) व्यायाम शाळा दुरुस्ती करुन देणे.
4) जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करुन देणे.
5)गावामध्ये सार्वजनिक शौचालय बाधुंन देणे.
लहांगेवाडी 100% टक्के गाव आदिवासी असुन तेथे लोकसंख्या 1,100 ते 12,40 असुन आदिवासी बहुल भाग आहे म्हणून दूर्लक्ष केले जात असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
आणि निवेदनाची भूमिका नाशिक जिल्हा अध्यक्ष सुनील खराटे यांनी घेतली असून , नाशिक जिल्हा उपाध्यक्ष योगेश लहांगे नाशिक जिल्हा सचिव बाळा तसेच किशोर माळी, दादू माळेकर, रामदास लहांगे, किरण लहांगे, गणेश लांडे, देविदास आडे, संदिप लहांगे, गोटिराम आस्वले इत्यादी उपस्थित होते व वरिल पैकी गरजा लवकर उपलब्ध करुन असे सांगितले.
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆
_जाहिराती साठी संपर्क साधा_
+917350334020
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆



0 Comments
जय आदिवासी
जय जोहार