अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
नाशिक जिल्हा वार्ताहर- बिरसा क्रांती दल संघटनेच्या अहमदनगर जिल्हा वतीने आज दि २०-०९-२०२१ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बिरसा क्रांती दल संघटनेनी केलेल्या मागण्या राजूर ते दिगंबर खौरवाडी या मार्गावर ४००मिटर रस्ता पावसाळ्यात तो पुर्णपणे बंद होतो त्यामुळे ४०० ते ५०० लोकसंख्या असलेल्या वाड्यांची गैरसोय होते या ठिकाणी सर्व लोक पुनर्वसित आहेत.तरी हा लवकरात लवकर पूर्ण करुन सुरू करणे.
विठेवाडी ठाकरवाडी, पिण्याच्या पाण्याची टाकी दुर्मिळ झाली आहे ती दुरुस्त करून द्यावी ठाकरवाडी ते नदी जोड रस्ता ७००कि ,धोबी घाटापर्यंत नदीचे पाणी पोहचत नाही.
तसेच बस थांबा मिळणे बाबत.
आदिवासी बांधवांच्या विविध समस्या घेऊन बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांनी अकोले तालुका आमदार डाॅ किरण लहामटे यांची भेट घेऊन तालुक्यातील समस्या सोडविण्याची मागणी केली.
यावेळी आमदार डाॅ किरण लहामटे साहेब यांनी ही चांगल्या पद्धतीने समस्या जाणून घेतल्या व या वर लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.
यावेळी बिरसा क्रांती दल संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मा.संतोष बोटे, अकोले तालुका अध्यक्ष मा.विजय मेंगाळ, उपाध्यक्ष मा.लहू मेंगाळ, संघटक विकास उघडे,अजय उघडे, नवनाथ उघडे, व इतर आदिवासी बांधव अंकुश उघडे, अमृत लोटे लखन उघडे, राहुल कातोरे, तुषार उघडे.
तसेच बिरसा क्रांती दल संघटनेचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments
जय आदिवासी
जय जोहार