आश्रम शाळेच्‍या आवारात विद्यार्थ्यांचा मृतदेह; नवापूर तालुक्‍यातील घटना




नंदुरबार : नवापूर तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी सदर घटना उघडकीस आली असून आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकाऱी शाळा प्रशासनाचे सोयी सुविधांकडे दुर्लक्षामुळे सदर प्रकार झाल्‍याचे सांगितले जात आहे. 


नवापुर तालुक्यातील धनराट शासकीय आश्रम शाळेत इयत्ता दहावीत शिकत असलेल्या भाऊ करज्या गावीत (वय १६) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर विद्यार्थ्याचा मृतदेह सकाळी साडे सहाच्या दरम्यान शाळेच्या आवारात पडलेला आढळून आला. विद्यार्थ्यांनी शिपाईला सांगितल्यावर त्याने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह पालकांच्या हाती देण्यात आला असून त्यावर भोवरे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच मृत्‍यू

अवघ्या सोळा वर्षीय विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी व शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच झाला असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे. अनेक आश्रम शाळांमध्ये पर्याप्त सुविधा उपलब्ध नाहीत. यावर वारंवार पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून मागणी करून देखील आदिवासी विकास विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करतात.


सकाळी व्‍यायाम करताना पडला

सदर विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत प्रकल्प अधिकारी व शाळा प्रशासनाने सकाळी व्यायाम करण्यासाठी गेले असता रनिंग करताना खाली पडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते अशी माहिती देण्यात आली आहे. यावर पालकांनी आक्षेप घेत सदर विद्यार्थ्याचा मृत्यू हा शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेचा अधिक तपास नवापूर पोलिस करीत आहे.



News Source (साम TV)



Post a Comment

0 Comments

झाले