महात्मा रावण व आदिवासींचा सांस्कृतिक संघर्ष.

By आदिवासी युवा 


महात्मा रावण व आदिवासींचा सांस्कृतिक संघर्ष.

आदिवासींचा ब्राम्हण्याशी नी ब्राह्मण्याचा आदिवासींशी सांस्कृतिक संघर्ष ----- 


डॉ.संजय  दाभाडे ( Dr Sanjay Dhabhade ) ,पुणें ,  9823529505

( शुक्रवार , १५ ऑकटोबर २०२१ ) 


महाराष्ट्रात आज ठिकठिकाणी आदिवासींनी ' महात्मा  रावणा ' ला अभिवादन केलें.

दस्तुरखुद्द थोर अभ्यासक वि.भि. कोलते ह्यांचं 

'महात्मा रावण ' हें पुस्तक ( सुगावा प्रकाशन ,पुणें ) प्रसिद्ध आहे. वस्तुस्थिती अधोरेखित करण्यासाठी कोलतें सारख्या विद्वानांची साक्ष काढणं अटळ असतं , त्याशिवाय चर्चाविश्वाला अधिमान्यता मिळत नाहीं.

तर मूळ मुद्दा असा कि चंद्रपूर ह्या आदिवासी जिल्ह्यात महात्मा रावण ह्यांची आज आदिवासींनी सन्मानाने  भव्य  मिरवणूक काढली.

आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात आदिवासी संघटनेनं प्रशासनाला पत्रं दिलं कि रावण दहन करण्यास प्रतिबंध केला जावा.

नंदुरबार  ह्या आदिवासी  जिल्हातील अक्कलकुवा तालुक्याच्या पर्वतरांगेत काठी ह्या आदिवासी संस्थानात महात्मा रावण ह्यांना दोहरा खांबाच्या रूपात अभिवादन केलें जाते.

एकंदरीत हें स्पष्ट आहे कि रावण दहन करणारे उच्चवर्णजातीय नी रावणास महात्मा मानून त्यांस अभिवादन करणारे आदिवासी हा सांस्कृतिक संघर्ष आपणास फ़ार ठळकपणे दिसून येतों.

जर राक्षस ह्या शब्दाची मूळ व्युत्पत्ती बघितली तर रावणाला राक्षस संबोधणे सुद्धा योग्यचं आहे असं म्हणता येईल. परंतु ब्राम्हणी पुराणांनी राक्षस शब्द पूर्णपणे बदनाम केला. कॉम्रेड शरद पाटलां नी 'आर्य आणि अनार्य' ह्या पुस्तकांत राक्षस शब्दाचा अर्थ ' रक्षण करणारा ' असा सांगितला आहे. ( शरद पाटील : आर्य आणि अनार्य, मावळाई प्रकाशन , शिरूर , पेज नंबर १० ).

दुसरीकडे इथं अब्राम्हणी चर्चा विश्वात व ब्राम्हणी सांस्कृतिक प्रभुत्वाला आव्हान देणारा आंबेडकरी विचार प्रवाह आहे नी खुद्द आंबेडकरांनी त्यांच्या

'रिडल्स इन हिंदुइझम ' ह्या महत्वपूर्ण ग्रंथात रामायणातील शंबुक हत्येची पुरेशी चर्चा केली आहे.

रामायण खरे का कपोलकल्पित हा मुद्दा आहेच परंतु त्याआधारे इथल्या सांस्कृतिक संघर्षाचे आकलन करुन घेणें महत्वाचे ठरते.

अश्या प्रकारे आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीत शंबुकाचे तर आदिवासी सांस्कृतिक चळवळीत महात्मा रावणा चे महत्वपूर्ण स्थान लक्ष्यात घेऊन इथल्या ब्राम्हणी फॅसिझम शी सांस्कृतिक पातळीवर मुकाबला करतांना त्यांची काहीएक मद्त होऊ शकते.

तसेंच इथल्या तथाकथित मुख्य प्रवाहातील चर्चा विश्वात , सत्ताधारी वर्गात नी त्यांच्याच बटिक असलेल्या प्रसिद्धी माध्यमांत आदिवासींच्या अब्राम्हणी , अपौराणिक प्रथा परंपरांचीं नोंद व  द्खल घेतलीच जाणारं नाहीं.

पण तरीही इथल्या मूळ  प्रथा परंपरेचा सूर्य उगवणं नां कधीं थांबलं होतं नां कधी थांबणार आहे....!


🔳 डॉ.संजय दाभाडे (Dr Sanjay Dhabhade ) , पुणें ,

     9823529505, sanjayaadim@gmail.com

Post a Comment

0 Comments

झाले