आदिवासींना मोफत शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्यासाठीच्या विशेष मोहिम कालावधी वाढविला...

 By. आदिवासी युवा


नाशिक. राज्यातील आदिवासी अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शासकिय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड ही कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा कालावधी ३१ ऑक्टोंबर, २०२१ रोजीपर्यंत वाढविण्यात आला आहे. 


ही मोहीम सप्टेंबर महिन्याच्या कालावधीतच ही मोहीम राबवण्यात येणार होती. हा कालावधी अपुरा असून त्यात वाढ करण्याची मागणी आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून शासनाकडे केली होती. याची दखल घेऊन अखेर आदिवासी विकास विभागाने या विशेष मोहिमेचा कालावधी ३१ ऑक्टोबर पर्यंत वाढविला असून याबाबत आदिवासी विकास विभागाने पत्र काढले आहे.


आदिवासी अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शासकिय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड ही कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प स्तरावर विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. 


सदर मोहिमेचा कालावधी अपुरा असल्यामुळे हा मोहिमेचा कालावधी वाढविण्याची मागणी श्रमजीवी संघटनेसह, आदिवासी बांधवांकडून होत होती. त्यामुळें विशेष मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त आदिवासी बांधवांना मिळावा यासाठी "समर्थन" संस्थेच्या वतीने आदिवासी विकास विभागाला पत्र देऊन विशेष मोहिमेचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती.


आदिवासी संघटनेच्या मागणीची दखल घेत ८ ऑक्टोबर रोजी पत्र काढून या विशेष मोहिमेचा कालावधी ३१ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आला आहे. 


शिवाय या विशेष मोहिमेकरिता आवश्यकतेनूसार जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळांमध्ये याकरिता शिबीरांचे आयोजन करण्यात यावे. 


तसेच, शिबिराच्या अंमलबजावणीत सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी व गावातील पोलीस पाटील यांचा समावेश करण्यात यावा असेही सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासी बांधव आणि संघटनांकडून समाधन व्यक्त केले जात आहे.



आदिवासी युवा बातम्या👇👇👇


15 टक्के फी सवलत न देणा-या शाळांचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

 

बिरसा फायटर्स संघटनेतर्फे आदिवासी कातकरी बांधवांना कपडे वाटप



रावण दहन प्रथा बंद करावी बिरसा क्रांती दल व राणी दुर्गावती महिला मंडळ यांची मागणी


कथा,लेख,मनोगत, वाढदिवस,कविता,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा  मो.नं. 7350334020 

💁‍♂️ 🪀WhatsApp करा 👇

        🏹आदिवासी युवा🚩 

 https://wa.me/message/3E344UV57DDMB1



Post a Comment

0 Comments

झाले