कुडावळे आदिवासी वाडीत पाण्याची व्यवस्था करावी

By आदिवासी युवा


कुडावळे_आदिवासी_वाडीत_पाण्याची_व्यवस्था_करावी


📝गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना बिरसा फायटर्सचे निवेदन 


रत्नागिरी :कुडावळे आदिवासी वाडीत पाण्याची व्यवस्था करण्यात यावी,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दापोली पंचायत समिती गटविकास अधिकारी आर एम दिघे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.  


कुडावळे_आदिवासी_वाडीत_पाण्याची_व्यवस्था_करावी

निवेदनात म्हटले आहे की,  कुडावळे आदिवासी वाडीत लोकांची पाण्यासाठी वणवण  भटकंती सुरू असून पावसाळ्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी या लोकांना 2 किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागत आहे. 

         

कुडावळे गावात 12 वाड्यासाठी पाणी पुरवठा योजना आहे. परंतु वीजबील थकल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे आदिवासी वाडीतील लोकांना वीजबील भरून ही हक्काच्या पाणीपुरवठा योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. कुडावळे आदिवासी वाडी ही डोंगर उतारावर असल्यामुळे या वाडीत पर्यायी कोणतेही पाणी योजना उपलब्ध नाही. त्यामुळे लोकांना केवळ नळपाणी योजनेवर अवलंबून राहावे लागते.

       

डोंगर उतारावर एक छोटा डुरा आहे.पावसाच्या पाण्यावरच त्या डु-यात थोडं पाणी मिळते.पाऊस बंद झाला की हा डुरासुद्धा तळ गाठतो. त्यामुळे वाडीत तीव्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या आदिवासी वाडीतील लोक गरीब आहेत. तळहातावर मोलमजूरी करून आपले पोट भरतात.तेव्हा ही लोक विकत पाण्यासाठी पैसे कोठून आणतील? नळपाणी बंद असल्यामुळे वाडीत विहीर सुद्धा नाही. 


त्यामुळे या आदिवासी लोकांचे खूपच हाल होत आहेत. म्हणून शासनाने या आदिवासी वाडीला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना देऊन पाण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली आहे. 


निवेदन देतेवेळी सुशिलकुमार पावरा,राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स , सूर्यकांत रावताळे युवा कार्यकर्ता ,राम पवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.


रावण दहन प्रथा बंद करावी बिरसा क्रांती दल आंबेगाव तालुका यांची मागणी


चालक पोलिस शिपाई भरती भंडारा २०१९ लेखी परिक्षेतील एसटी प्रवर्गातून बोगसांचे नावे वगळण्यात यावे - बिरसा फायटर्स


सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कोरोना व्हॅक्सीन घेणे कोणावरही बंधनकारक नाही 


कथा,लेख,मनोगत, वाढदिवस,कविता,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा  

मो.नं. 7350334020 

💁‍♂️ 🪀WhatsApp करा 👇

        🏹आदिवासी युवा🚩 

 https://wa.me/message/3E344UV57DDMB1



Post a Comment

0 Comments

झाले