आदिवासी समुदायांचे कोयावंशी असलेले गोंडराजे महात्मा रावेण पेन मंडावी ( लंकापती रावण) यांचा दशहरा पुतळा दहन करु नये म्हणून उत्तर महाराष्ट्रातील सर्व संघना एकवटल्या

प्रतिनिधी :- दादाजी बागुल कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य 




महात्मा रावण यांचा दसऱ्याच्या दिवशी पुतळा दहन करू नये, म्हणून आज दिनांक  14/10/2021 रोजी उत्तर महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी विविध ठिकाणी जाऊन निवेदनाद्वारे प्रशासनाला विनंती केली आहे 



बागलाण तालुक्यातील बिरसा फायटर्स संघटनेचे पदाधिकारी दादाजी बागुल कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, उमाकांत कापडणीस नाशिक जिल्हा महासचिव. जायखेडा ( बागलाण) बिरसा फायटर्स तालुकाध्यक्ष आकाश पवार, रवि पवार तालुका संघटक, विशाल माळी सदस्य. जायखेडा (बागलाण) आदिवासी समाज सेवा व बहुउद्देशीय संस्था बागलाणचे अध्यक्ष प्रवीण पवार सर . 


बिरसा फायटर्स मालेगाव तालुक्यातील ज्ञानेश्वर मोरे तालुका उपाध्यक्ष व आदिवासी विचार मंच गरबड ( मालेगाव) येथील जितेंद्र रगतवान, सोमनाथ भांगरे, सुदाकर वेडेकर, समाधान गुमाडे, प्रविण सबगर , गणेश जाधव आदी उपस्थित होते व 


 विविध ठिकाणी निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की 



गोंड सहीत संपूर्ण आदिवासी समुदायात प्राचीण काळापासूनच मातृसत्ता ही प्रथा प्रचलित व अद्याप आहे . तसेच कोयावंशी गोंडराजा रावेण मंडावी पेन ( लंकापती रावण ) हे प्राचीण काळापासूनच गोंड सहीत संपुर्ण आदिवासी समुदायाचे कोयावंशी गोंडराजे असून , गोंडी रेला पाटा व गोंडी ढेमसा मध्ये त्यांचा उल्लेख आहे . राज्यात तसेच देशात कोयावंशी गोंडराजा रावेण मंडावी पेन ( लंकापती रावण )  यांचा अपमान होत असल्याने समुदायात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहेत . त्यामुळे ,

 १ ) IPC ची धारा २ ९ ५ व २ ९ ५ ( अ ) अन्वये , वरील दोन्ही प्रथेला बंद करणे 


 २ ) IPC ची धारा २८५ अन्वये , सार्वजनिक जागेत आगजनी थांबविण्याकरीता . 


३ ) समुदायात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये , त्याकरीता कलम ५०४ अन्वये , कार्यवाही करणे .


 ४ ) राज्यघटनेतील ( संविधान ) कलम ३४ अंतर्गत सामाजिक शांती , सामाजिक एकता भंग न होण्यासाठी 


वरिल  प्रथेला बंद करणे . करीता वरील राज्यघटनेतील सर्व धारेचा व शासकीय यंत्रणेचा उपयोग करुन , गोंड सहीत संपुर्ण आदिवासी समुदायातील आदरणीय , पुज्यणीय कोयावंशी गोंडराजा रावेण मंडावी पेन यांचा दशहरा दिवशी पुतळा दहन करु नये 



जय आदिवासी जय जोहार जय बिरसा जय एकलव्य






Post a Comment

0 Comments

झाले