By आदिवासी युवा
गोवारी समाज हा अनु.जमाती प्रवर्गात येत नसल्याने पोलीस शिपाई भरती अंतिम निवडसुची
\ तयार करू नये महत्वाचा निर्णय
अप्पर पोलीस महासंचालक प्रशि व खास पथके महा. राज्य मुंबईंचे पोलीस शिपाई भरती जिल्हा (गॄह विभागांना २२/१०/२१चे पञ
प्रतिनिधी:- एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली महाराष्ट्र पोलीस चालक शिपाई भरती सन २०१९ चे नुकतेच निकाल जाहीर झाले होते यात भंडारा विभागात आदिवासी प्रवर्गात गैर आदिवासी चे नावे आल्याने आ.इ.ए.फे.व बिरसा फाइटर्स विदर्भ शाखेनी मुख्यमंञी,गॄहमंञी,आदिवासी विकास मंञी,पोलीस उपअधिक्षक (गॄह) भंडारा यांना तक्रार दाखल केली होती.
यावर सोशल मिडीयावर संघटनेचाचा असंतोष निर्माण झाला होता. गोवारी संबंधात मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लींचे अंतिम आदेश दि.१८/ १२ /२० महाराष्ट्र शासन विरूध्द केशव विश्वनाथ सोनोने आणि इतर यांचीसि.अपील no.४०९६ २०२० मध्ये गोवारी समाज हा अनु.जमाती प्रवर्गात येत नसल्याचा महत्वपुर्ण आदेश दिले आहेत.
गोवारी समाजातील अनुसुचित जमाती या प्रवर्गात उमेदवारांनी अर्ज केले असल्यास अशा घटकांचे त्यांचे अंतिमनिवड सुचि करू नये. सदर प्रकरणी क्रमांक प्रशिक्षण पो शिपाई भरती कार्यपध्दती ७१७/२०१८/ २०८३ अ पो महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महा राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई ४००००१दि 22आँक्टो २०२१ हे पञ संजय कुमार यांचे सहीने प्रसार माध्यमांना व सर्व जिल्हा प्रति आयुक्त व भ़डारा यांना सुध्दा पाठविण्यात आला आहे.
यामुळे सदर गॄह विभागाच्या निर्णयाचे व पञाचे आदिवासी संघटणा अखेर स्वागत करतील.व जर अन्याय होत असेल तर कधी संविधानिक मार्गाने अन्यायाच्या विरोधात लढा कायम राहील .उलगुलान जारी है, जारी रहेगा ! या ब्रिद वाक्यानुसार बोगसांच्या भरतीला आळा बसेल. असे संघटनाच्या वतीने सुरेशकुमार पंधरे प्रमुख विदर्भ/ संपर्क प्रमुख महाराष्ट्र बिरसा फाइटर्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार