आदिवासी वसतिगृह बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान!

By आदिवासी युवा


आदिवासी वसतिगृह बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान!

शहापूर | जव्हार व मोखाडा तालुक्यातील शासकीय आदिवासी वसतिगृह आजही बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी हिरमुसला झाली आहे. मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा महाविद्यालये चालू होऊन जवळपास 15 दिवस झाले आहेत.


या तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी मुलां-मुलींसाठी वसतिगृह अद्यापही चालू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तात्काळ ही वसतिगृह चालू करावीत अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.


एकीकडे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ग्रामीण, आदिवासी व अतिदुर्गम भागात कोरोनामुळे शिक्षणाचे पुरते नुकसान झाले आहे. कोव्हिडमूळे संपूर्ण राज्यातील शाळा महाविद्यालय बंद होती. त्या दरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पध्दतीने अध्ययन केले जात होते. मात्र, ग्रामीण, आदिवासी व अतिदुर्गम भागात ऑनलाईन अध्ययन पध्दती हवी तशी प्रभावी ठरली नाही.


पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी शहरांत किंवा तालुक्याच्या ठिकाणी जातात. अशा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत निवारा मिळून शांततापूर्ण वातावरणात शिक्षण घेता यावे याकरिता शासकीय आदिवासी वसतिगृह चालवली जातात. मात्र, शाळा महाविद्यालये सुरू होऊनही वसतिगृह चालू न झाल्याने ग्रामीण, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे.


अद्यापही वसतिगृह चालू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. जव्हार मोखाडा तालुक्यातील शासकीय वसतिगृह तातडीने सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.




Post a Comment

0 Comments

झाले