आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लवकरच बागलाण तालुक्यात पेसा संघर्ष कृती समिती बागलाण स्थापन होणार , चौथी बैठक संपन्न.

 By. आदिवासी युवा




बागलाण तालुका हा आदिवासीबहुल तालुका असल्याने विधानसभेसाठी आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ म्हणून ठेवण्यात आलेला आहे. सन 1978 पासून तालुक्यातील आदिवासी लोकप्रतिनिधी विधानसभेत आदिवासींच्या मुलभूत अधिकार व हक्कांसाठी निवडून दिला जात आहे.परंतु तालुक्यात पेसा अंतर्गत ग्रामपंचायतीची रचना पाहता तालुक्याचा पश्चिम भाग वगळता अन्यत्र पेसा कायद्याचा लाभ आदिवासीबहुल भागात होताना दिसत नाही. 


बागलाण तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागात मोठ्या प्रमाणात जंगले असुन आजुबाजूला व जंगलात आदिवासी समाजाच्या लोकवस्त्या ठिकठिकाणी दिसुन येतात. या भागातील बहुसंख्य ग्रामपंचायतींचा लोकसंख्येच्या आधारावर विचार केल्यास अनेक गावांत आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.असे असुनही बागलाण तालुक्यातील या पुर्व व उत्तर भागात राहणाऱ्या आदिवासींवर अन्याय झाल्यासारखे वाटते. 



एकाच तालुक्यातील आदिवासींमध्ये दुजाभाव केल्याचे चित्र दिसते.सन 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्यातील अनेक गावांमध्ये आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण वाढलेले असुनही आजपर्यंत तालुक्यातील पुर्व व उत्तर भागातील आदिवासींना पेसा अधिनियम 1996 मधील  आदिवासींचे हक्क व अधिकार यापासून आदिवासींना वंचित ठेवण्याचे षडयंत्र नेमके कोणाचे ?? असा प्रश्न निर्माण होतो. 


 म्हणून  बागलाण तालुक्यातील पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या व नवीन ग्रामपंचायतींचा खासकरून पुर्व व उत्तर भागातील ग्रामपंचायतींचा नव्याने लोकसंख्येच्या आधारावर सर्व्हे करुन तालुक्यातील पेसा पुनर्रचना करण्यात यावी व येथील आदिवासींना न्याय मिळवून देण्यात यावा. 


गेल्या 40 वर्षापासून बागलाण तालुक्यातील पुर्व व उत्तर भागातील आदिवासींवर अन्याय होत आहे.म्हणून आदिवासींना लवकरात लवकर न्याय मिळवा यासाठी एका आधाराची गरज असते म्हणून  जनजागृतीपर मोहीम राबवून आज जायखेडा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चौथी बैठक पार पडली.या बैठकीत बागलाण तालुका पेसा संघर्ष समितीची निर्मिती करुन तालुक्यातील आदिवासींवर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून शासनदरबारी प्रशासकीय लढा दिला जाईल,असे ठरविण्यात आले.


बैठकीत आदिवासी भिल समाज सेवा व बहुद्देशीय संस्थेचे  पदाधिकारी ,बिरसा फायटर्स संघटनेचे पदाधिकारी मा.विठ्ठल गातवे सरांचे विशेष मार्गदर्शन लाभले. 


यावेळी मा.प्रविण पवार सर,मश्चिंद्र बोरसे सर,वंकर सोनवणे,बापु वाघ,दादाजी बागुल ,आकाश पवार, परशुराम अहिरे,राजु वाघ,दत्ता सोनवणे व आजुबाजुच्या खेड्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.


येत्या काही दिवसांत पेसा संघर्ष कृती समिती बागलाण लवकरच स्थापन होणार आहे व आदिवासी समाजासाठी लवकरात लवकर संघर्ष सुरू होईल.



बिरसा फायटर्स जिल्हा गोंदिया युवा शाखेचा "स्वच्छग्राम, स्वच्छ परिसर, सुंदर ठेवा उपक्रम .




कथा,लेख,मनोगत, वाढदिवस,कविता,बातम्या व जाहिरातीसाठी मो.नं. 7350334020 हा नंबर आदिवासी युवा या नावाने सेव करून ठेवा व आपल्या ग्रुप ला जाॅईन करा🙏

        🏹आदिवासी युवा🚩 



Post a Comment

0 Comments

झाले