प्रतिनिधी :- दादाजी बागुल बिरसा फायटर्स
दिनांक 15 ऑक्टोबर 2021रोजी कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील भागूचीवाडी या आदिवासी वाडीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या सोबत दसरा सण साजरा केला
आपल्या भारतीय संस्कृतीमधील सणांचे महत्व शाळेतील विद्यार्थ्यांना कळावेत , आपली संस्कृती जपावी हा हेतू संस्थेचे संस्थापक श्री योगेशजी वनघरे यांनी ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते
कार्यक्रम वेळी शाळेस अग्निशमन यंत्र , विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सतरंज्या नास्ता व खाऊ वाटप करण्यात आला
कार्यक्रमास संस्थेचे श्री योगेशजी वनघरे , श्री नितीश जी राठोड , ग्रामपंचायत सदस्या जानकी पारधी , ग्रामपंचायत माजी सरपंच रेवती ढोले , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश पारधी , संतोष शेंडे , राम ढोले , लहू ढोले , दिनेश निरगुडे , शाळा मुख्याध्यापक हरीचंद्र आढारी सर व विद्यार्थी उपस्थित होते

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार