By आदिवासी युवा
प्रतिनिधि :- दादाजी बागुल बिरसा फायटर्स
दापोली : उत्तर प्रदेशमधील लखमीपूर खीरी येथे शेतकरी विरोधी कायद्याविरोधात आंदोलन करणा-या शेतक-यांना केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने गाडीने चिरडले.या घटनेचा निषेध म्हणून आज 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी व समविचारी संघटनांनी संपूर्ण भारत बंदसाठी आवाहन केले होते.या बंदला दापोली शहर व शहरातील व्यापा-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज दापोलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने कळकळीत बंद ठेवण्यात आली.
लखीमपूर खिरी येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे व माणूसकीला काळीमा फासणारी आहे.अशी घटना पुन्हा कुठेही घडू नयेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आम्ही आज दापोलीतील व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. दापोलीतून भारत बंद ला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.असे मत दापोलीतील प्रसिद्ध व्यापारी अपी मोरे यांनी व्यक्त केले.यावेळी मामा कुमटेकर,बाळा टोकरे,वसंत कुमटेकर ,अक्षय केळसकर ,अपी मोरे आदि व्यापारी उपस्थित होते. अशी घटना पुन्हा घडू नयेत असे मनोगत सर्व व्याप-यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीतील काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस,शिवसेना सोबत समविचारी पक्षांनी या बंदमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवला.बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेसोबतच काही सामाजिक संघटनांनीसुद्धा या भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला.
आम आदमी पार्टीचे मारोती पुरी यांचा गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश
महाराजा रावन व महिषासुराच्या प्रतिमांच्या दहणाची प्रथा बंद करा गोंडवाणा गणतंञ पार्टीची मागणी

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार