By आदिवासी युवा
⬛ अजस्र कोळसा खाणी , जल - जंगल - जमिनी -आदिवासींचे
उध्वस्तीकरण नी निसर्गाचे इशारे .....
( डॉ.संजय दाभाडे , ( Dr. Sanjay Dabhade ) पुणें 9823529505 ).
शुक्रवार , १५ ऑकटोबर २०२१ ....
जिकडं तिकडं कोळसा तुटवड्याची चर्चा सुरू आहे.
तुटवडा खरंच आहे कि अदानीला मोकळं रान देण्यासाठी तुटवडा निर्माण केला जातोय....?
कोळसा खाणींचे भांडवलदार मालक नी त्या भांडवलदारांच्या हितासाठी काहीही करण्यास तयार असणारी सरकारे जल जंगलं जमिनी , आदिवासीं ना नी पर्यावरणाला उध्वस्त करून कोळसा खाणी खणून काढतात.
छत्तीसगड मधील हंसदेव जंगलात अदानीला खाणी सुरू करायच्यात त्याविरोधात तिथल्या आदिवासींनी साडे तीनशें किलोमीटर पायी चालत लॉन्ग मार्च काढला , आता लॉन्ग मार्च छत्तीसगड ची राजधानी रायपूर इथं पोहोचलाय.
कोळश्याच्या बातम्यां देतायंत नी राज्यकर्ते पण बोलताहेत कोळश्याबद्दल परंतु जल जंगल जमीनी , पर्यावरण नी आदिवासींच्या विनाशा बद्दल कोण बोलतंय.....?
तथाकथित विकासासाठी आदिवासी नी पर्यावरणाला किती वेठीस धरणार आहात ....?
तुमच्या ह्या भीषण भुकेच्या विरुद्ध आदिवासी उठून संघर्ष करतायेत नी निसर्ग देखील तुम्हाला धडा शिकवतोय जगभर .
तुम्ही कुणीच आदिवासींबद्दल बोलणार नाहीत हें आम्हांला ठाऊक आहे ,
परंतु निसर्ग आमच्या वतीनं तुम्हांला जगभर इशारा देतोय ह्याचे भान ठेवा.....!
डॉ.संजय दाभाडे, ( Dr. Sanjay Dabhade ) पुणें 9823529505
sanjayaadim@gmail.com

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार