आदिवासी वसतीगृहे व समाजकल्याण वसतिगृहे त्वरित सुरू करा - बिरसा फायटर्सची मागणी










प्रतिनिधी :- दादाजी बागुल कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य 

रत्नागिरी : राज्यातील शासकीय आदिवासी वस्तीगृहे आणि समाज कल्याण वस्तीगृहे त्वरित सुरू करावी,अशी मागणी सुशिलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,आदिवासी विकासमंत्री,समाजकल्याणमंत्री, आयुक्त आदिवासी विभाग नाशिक, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की,४ ऑक्टोबर पासून शासन निर्णयानुसार राज्यातील सर्वच शाळा,महाविद्यालयांनी इ. ८ ते १२ पर्यतचे वर्ग सुरू करण्यात आले.राज्यात बऱ्याच भागात कोविड-१९ चे नियम पाळून १५ जुलै पासुन  शाळा, महाविद्यालये नियमितपणे सुरू आहेत



मात्र, राज्यातील अनेक शासकीय आदिवासी आणि समाज कल्याणची वसतिगृहे अद्यापही बंदच आहे.त्यामुळे तालुक्याचा,जिल्ह्याचा ठिकाणी वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.


अगोदरच कोविडमुळे दीड वर्षापासून विद्यार्थी शिक्षणापासून लांब आहे.विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे.तरी,वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी अद्यापही बंद असलेले वसतिगृह त्वरित सुरू करावीत.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.




Post a Comment

0 Comments

झाले