रावण दहनासाठी पुतळा बनविणा-या शिरपूर तालुक्यातील सुळे गावातील लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा,बिरसा फायटर्स ची मागणी

प्रतिनिधी :- दादाजी बागुल कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य 
शिरपूर: गाव सुळे तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील रावण दहन रोखण्यात यावे व रावण दहनासाठी पुतळा बनविणा-या व पुतळा  दहन करणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी पोलीस निरीक्षक शिरपूर पोलीस ठाणे व पोलीस अधिक्षक धुळे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. 
                  निवेदनात म्हटले आहे की, दस-याच्या दिवशी रावण दहन प्रथेला बिरसा फायटर्स संघटनेचा तीव्र विरोध असून, आदिवासी समाजाकडूनही देशभर तीव्र विरोध केला जातआहे. रावण दहन करू नये म्हणून  ठिक ठिकाणी आदिवासी संघटनांतर्फे  निवेदन देण्यात आली आहेत. राजा रावण हा आदिवासी संस्कृतीचे श्रद्धास्थान व  दैवत आहे. महान धर्म निष्ठ,विद्वान ,संगीत तज्ञ,राजनितीज्ञ,शिल्पकार,आयुर्वेदाचार्य,विवेकवादी,उत्कृष्ट रचनाकार,न्यायप्रिय राजा म्हणून ओळखले जाते. षडयंत्रकारी वर्णव्यवस्थेने रावण राजाला बदनाम करण्यासाठी रावणाचा पुतळा जाळण्याची प्रथा निर्माण केली आहे. भारतात राजा रावणाची अनेक ठिकाणी मंदिरे असून श्रद्धा भावनेने रावणाची  पूजा केली जाते. तामिळनाडूत 352 मंदिरे व मध्यप्रदेश मध्ये मंदसीर येथे रावणाची सर्वात मोठी मूर्ती आहे. महाराष्ट्र ,छत्तीसगड,झारखंड,मध्यप्रदेश मध्ये अनेक गावात रावणाची पूजा केली जाते. म्हणून  रावण दहन प्रथा बंद केली पाहिजे. रावण दहन कुठेही होऊ देऊ नये.रावण दहनास कुठेही परवानगी देण्यात येऊ नये.
        गाव सुळे तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे रावण दहनासाठी पुतळा बनविण्यात आला आहे. रावणाचा पुतळा जाळल्यास आदिवासी समाजात संताप निर्माण होऊन  महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.म्हणून तात्काळ सदर गावातील रावण दहन कार्यक्रम कायदेशीर  थांबवावा.
         कायद्यानूसार रावण दहन करणे हा गुन्हा आहे माहिती असूनसुद्धा  गाव सुळे तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील रावण दहनासाठी पुतळा बनविणा-या लोकांमुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर तीव्र संताप निर्माण झाला आहे. आदिवासी समाजात तेड निर्माण करणा-या,धार्मिक भावना दुखावणा-या,शांततेचा भंग करणा-या सुळे गावातील सरपंच सहीत कृत्यात शामिल असणा-यांवर भारतीय दंड संहिता 1880 अन्वये कलम 153,153 अ,283,283 अ, 298 व अॅस्ट्रासिटी अॅक्ट ,मुंबई पोलीस अॅक्ट नूसार  गुन्हे दाखल करून  तात्काळ अटक करण्यात यावी. हीच नम्र विनंती. अन्यथा बिरसा फायटर्स संघटना याविरोधात तीव्र आंदोलन छेडेल याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा सुद्धा बिरसा फायटर्स तर्फे देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

झाले