By. आदिवासी युवा
| रावण दहन प्रथा बंद करावी बिरसा क्रांती दल व राणी दुर्गावती महिला मंडळ यांची मागणी |
दादाजी बागुल प्रतिनिधी : गोंदिया येथे निवेदन देण्यात आले - रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान व दैवत आहे. अनार्यांच्या तो महासम्राट होता. परंतु 1930 पासून त्याला जाळतात. त्यांच्या बद्दलचा राग द्वेष मत्सर व त्याला अपमानित उपरोधिक नावाने राक्षस संबोधून जाळतात. त्यामुळे आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात व येणाऱ्या पिढीमध्ये ही द्वेष मत्सराची व पेटवून देण्याची भावना कायम रुजून राहते समाजामध्ये शान्ति सुरक्षा भाईचारा समता न्याय बंधुता कायम ठेवण्यासाठी प्रत्येकांच्या धार्मिक भावना व देवी-देवतांच्या आदर्श महामानवांना वंदन करण्याच्या सन्मान करण्याचा संविधानिक अधिकार व स्वातंत्र्य आहे तेव्हा रावण दहन प्रथा बंद करावी.
समस्त मूलनिवासी आदिवासी समाजाच्या भावनेच्या विचार व्हावा. या प्रथेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून रावण दहन या विक्षिप्त कृतिला कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात येऊ नये. यादरम्यान अशा विक्षिप्त कृतीचे जे कोणी समर्थन करतील किंवा न्यायप्रिय राजाचा अपमान करतील अशा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा.
जर दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याचा प्रयत्न केला गेला तर सर्व आदिवासी समाजाकडून तसेच इतरही समाज संघटनांकडून तीव्र स्वरूपात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येईल याची नोंद घ्यावी, ही विनंती.
गियाताई सलाम (राणी दुर्गावती मंडळ,) मालती किनाके(बिरसा क्रांती दल, संघटक)
हेमलता अहाके,अतुल सतदेवे,सरिता भलावी,गिताताई तुमडाम,बिंदु कोळवते,शोभा कुसराम,लता मडावी,वनिता सलाम,योगिता गेडाम,हिमांशु अहाके,लोकेश कुसराम,सुनित उईके,आदित्य सलाम इत्यादि आदिवासी पदाधिकारी उपस्तीत होते.
नेशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, संविधान मैत्री संघ व अन्य मित्र संघटना गोंदिया जिल्हा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
बिरसा क्रांती दल नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका उपाध्यक्ष मा .श्री एकनाथ गायकवाड माजी सभापती व सचिव मा. श्री पुंडलिक वाघेरे यांची निवड
कथा,लेख,मनोगत, वाढदिवस,कविता,बातम्या व जाहिरातीसाठी मो.नं. 7350334020
💁♂️ 🪀WhatsApp करा 👇
https://wa.me/message/3E344UV57DDMB1

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार