By. आदिवासी युवा
प्रतिनिधी, शिरपूर
राज्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना ओला दुष्काळ, अतिवृष्टिची नुकसान भरपाई मिळण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री, कृषी राज्यमंत्री, व जिल्हाधिकारी, धुळे यांना उपविभागीय अधिकारी, शिरपूर भाग, शिरपूर तहसीलदार शिरपूर यांच्यामार्फत बिरसा फायटर्स कडून निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र राज्यातील शेती ही पूर्णत: मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यातच आदिवासी बहुल अनेक तालुक्यातील आदिवासी शेतकरी हा जास्त प्रमाणात वनपट्टेधारक आहेत. जो मागील ४ ते ५ वर्षांपासून नैसर्गिक संकटांनी कोलमोडून गेलाय. त्यातच या वनपट्टेधारक शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची सरकारी मदत मिळत नाही. परिणामी कर्ज काढून शेती करणारा हा शेतकरी दिवसेंदिवस अधिकच कर्जबाजारी झालेला आहे.
राज्यातील वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही यावर्षीचा ओला दुष्काळ, अतिवृष्टिने झोडपून काढलेले आहे. शेतातील कापूस, मूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, भूईमूग आदी पीके हातची गेलेली आहे. त्यामुळे शेतकरी सावकारी कर्ज आणि नैसर्गिक संकटामुळे दुहेरी संकटात सापडलाय. तसेच वाढलेली महागाई, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की जगाव की मरावं?
राज्य शासनाकडून नैसर्गिक संकटकाळी दिली जाणारी शेतीची नुकसान भरपाई महाराष्ट्रातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांनाही विनाविलंब मिळवून द्यावी. अशी मागणी विलास पावरा अध्यक्ष नाशिक विभाग, वसंत पावरा अध्यक्ष धुळे जिल्हा, साहेबराव पावरा सचिव धुळे जिल्हा, ईश्वर मोरे तालुकाध्यक्ष शिरपूर, रविंद्र पावरा, कार्याध्यक्ष शिरपूर, गेंद्या पावरा, सचिव शिरपूर ता. व शेतकरी विशाल पावरा, भाईदास पावरा, वेरसिंग पावरा, विजय पावरा, डॉ. किशोर सुर्यवंशी, डॉ. सरोज पाटील,उमेश पावरा उपस्थित होते.
आम आदमी पार्टीचे मारोती पुरी यांचा गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश
महाराजा रावन व महिषासुराच्या प्रतिमांच्या दहणाची प्रथा बंद करा गोंडवाणा गणतंञ पार्टीची मागणी

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार