प्रतिनिधी दादाजी बागुल
गोंदिया जिल्हा वार्ताहर-केमतुकुम (बामणी) तहसील बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर येथील जिल्हा परिषद शाळे मधील नराधम मुख्याध्यापक यांचेकडून शाळेतील अल्पवयीन आदिवासी गरीब कुटुंबातील सात विद्यार्थ्यीनींवर लैगिंक शोषण व अत्याचाराची घटना घडलेली आहे.या नराधम मुख्याध्यापक शिक्षकाला पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले.अशा प्रकारच्या विशेषत: आदिवासी समाजातील मुलींवर लैंगिक शोषणाचे गुन्हे वांरवार घडत असल्यामुळे या स्वतंत्र भारतात आजही मागासलेल्या समाजाला न्याय मिळवून देण्यात नेहमीच उशीर होत आहे.याकरिता सर्व समाज संघटनेच्या वतीने खालील प्रमाणे मागणी करीत आहोत.
खालील सर्व मागण्या मान्य करून गरीब आदिवासी मुलींना व परिवाराला न्याय मिळवून द्यावा.
१) नराधम शिक्षकाला बडतर्फ करून फाशी देण्यात यावी
२) पीडित मुलींच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने परिपत्रक काढावे
४) पीडित मुलींना अर्थसाह्य म्हणून २५ लाखांची मदत राज्य सरकारने करावी
५) गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारच्या घटनांची चौकशी करून त्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नामांकित वकीलाची नियुक्ती करावी
६)अशा घटना वारंवार घडू नये आदिवासी विद्यार्थिनीवर असे प्रसंग येऊ नये यासाठी कठोर कायदे करावेत.
वरील सर्व मागण्या मान्य करून शासनाने योग्य ती कारवाई करावी अन्यथा सर्व समाज आदिवासी संघटना व बिरसा क्रांती दला तर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा अशायाचे निवेदन आज दि २० / १० /२०२१ रोजी उपविभागीय अधिकारी, sdo शिरसाट साहेब प्रशासकीय इमारत गोंदिया यांना व यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांना पाठविण्यात आले यावेळी उपस्थित, सौ मालती कनके,बिंदू कोडवाते, मनिषा कुंभरे, सरिता bhalavi, हेमलता अहाके अतुल सातदेवे, हिमांशू अहाके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


0 Comments
जय आदिवासी
जय जोहार