बोरविहीर तालुका जिल्हा धुळे येथे एकलव्य भिल्ल समाज संघटनेची एक बैठक पार पडली.

By आदिवासी युवा


बोरविहीर तालुका जिल्हा धुळे येथे एकलव्य भिल्ल समाज संघटनेची एक बैठक पार पडली.


जय एकलव्य जय आदिवासी मित्रांनो

बोरविहिर. काल दिनांक 10/10/21 रोजी  मातोश्री सुमित्राताई पवार यांच्या आदेशाने आणि सूर्यकांत भाऊ पवार यांच्या मार्गदर्शना खाली बोरविहीर तालुका जिल्हा धुळे येथे एकलव्य भिल्ल समाज संघटनेची एक बैठक पार पडली. 


या कार्यक्रमात बोरविहिर गटातील आदिवासी तरुण समाविष्ट झाले होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक देवा भाऊ सोनवणे (धुळे जिल्हा एकलव्य समाज संघटना अध्यक्ष) हे होते. 


तसेच सामाजिक समस्या व प्रबोधनाचे कार्य प्रवीण मोरे सर (जळगाव जिल्हा उपाध्यक्ष) यांनी केले सोबत अंकुश सोनवणे (चाळीसगाव तालुका दंड नायक  ग्रुप कार्याध्यक्ष), सुनील मोरे (एकलव्य समाज संघटना चाळीसगाव तालुका सचिव) ही उपस्थित होते. 


या बैठकीत मुख्य अतिथी म्हणून अशोक दादा खैरनार उपस्थित होते  तसेच जितू भिल नरडाणेकर यांनीही या बैठकीस हजेरी लावली. 


बैठकीत खालील विषयावर चर्चा झाली

  1.  नवीन शाखा बांधणी
  2.  स्मशानभूमीचा प्रश्‍न 
  3.  आदिवासी वस्तीतील रस्ते व कामे 
  4.  स्थानिक पोलीस स्थानकात मिळणारी वागणूक 
  5.  जिल्हा रुग्णालयात होणारी फसगत 
  6.  निवडणुकीच्या कालावधीत समाजाला कशा प्रकारे गृहीतधरले जाते. 


इत्यादि आदिवासी समाजाच्या समस्यावर चर्चा करण्यात आली. 











कथा,लेख,मनोगत, वाढदिवस,कविता,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा  मो.नं. 7350334020 

💁‍♂️ 🪀WhatsApp करा 👇

        🏹आदिवासी युवा🚩 

 https://wa.me/message/3E344UV57DDMB1




Post a Comment

0 Comments

झाले