आदिवासी युवा
![]() |
शेतकरी कामगार पक्षाच्या कळंब जिल्हा परिषद विभाग आढावा बैठकीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
दि.०५ ऑक्टोबर रोजी कळंब जिल्हा परिषद विभाग आढावा बैठक वारे जवळील टकले फॉर्म हाऊस येथे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख,सुदाम पेमारे,प्रविण पाटील आणि तालुक्यातील मृत्यू पावलेल्यांना श्रध्दांजली वाहून आढावा बैठकीला सुरुवात करण्यात आली.
![]() |
| शेतकरी कामगार पक्षाच्या कळंब जिल्हा परिषद विभाग आढावा बैठकीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद |
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणूका लक्षात घेऊन कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी,शिवसेना,कॉग्रेस अशा सर्वच प्रमुख पक्षानी कर्जत तालुक्यात आढावा बैठक सुरू करून पक्ष प्रवेश करून घेण्याचे सत्र सुरू केले असतानाच राष्ट्रवादी,शिवसेना पक्ष एकमेकांच्या पक्षातील कार्यक्रत्यांना आश्वासने,प्रलोभने देऊन पक्ष प्रवेश करून घेत आहेत काही प्रसंगी शेकापक्षावर टिका करताना शेकाप संपल्याची भाषा करणाऱ्यांना आजच्या कळंब जिल्हा परिषद विभाग आढावा बैठकीची गर्दी पाहून चांगलीच चपराक बसली.७०० ते८०० लोक जमल्याने आढावा बैठक लक्षवेधी ठरल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
तसेच भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे तालुक्यातील कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे, तालुका चिटणीस प्रवीण पाटील यासारख्या शेकाप पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांचे दुदैवी निधन झाल्याने मागील काही दिवसापासून कार्यक्रर्त्यांपर्यंत पोहचू न शकल्याची खंत आहेच,
तसेच आपला पक्ष आपल्या सोबतच आहे,आजही आपले निष्ठावंत कार्यक्रर्ते पक्षाबरोबर असल्याचे आजची गर्दी बघून आनंद वाटत आहे,तसेच शेकाप पक्षाला नावे ठेवणाऱ्या पुढाऱ्यांनी लक्षात ठेवावे कि,शेकापक्षा मुळेच आपण आमदार,खासदार झालेले आहात,एवढच काय तर संख्याबळ नसताना जिल्हा परिषद अध्यक्ष शेकापक्षामुळेच होऊ शकलात असे बबन भालेराव यांनी सांगितली.
तसेच आजची गर्दी पाहून येणाऱ्या काळात शेकाप स्वबळावर लढला तरी विजय आपलाच होणार असल्याचे विलास थोरवे यांनी सांगितले.तसेच युती संदर्भात आमच्या पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील ठरवतील त्याच पक्षाबरोबर युती करण्यात येईल तसेच युती बाबत जी काही चर्चा इतर लोकांकडून ऐकायला येते त्याबाबत काही तथ्य नसल्याचे प्रकाश फराट यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी समाज कल्याण सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे यांच्या कार्याप्रणालीवर विश्वास ठेवून आणि पक्षाच्या ध्येयधोरणे आवडल्याने ओलमण ग्रामपंचायत मधील बोरगाव,बोंडेशेत,गावातील तरूण कार्यक्रर्त्यांनी प्रवेश केला.
आढावा बैठकीसाठी माजी तालुका चिटणीस भाई विलास थोरवे, माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे,जिल्हा परिषद सदस्या सिमा पेमारे,उपसभापती जयवंती हिंदोळा,माजी उपसभापती यशवंत जाधव,अशोक पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पेमारे,पं.समिती सदस्या कविता ऐनकर,RDCC बँक माजी संचालक प्रकाश फराट,संचालक रविंद्र झांजे,अशोक भुसाळ,दादा पादीर,पुरोगामी युवक अध्यक्ष वैभव भगत,हनुमान बदे,कृष्णा बदे,रेवती ढोले सह पक्षाचे पदाधिकारी,सरपंच,सदस्य,कार्यक्रर्ते उपस्थित होते.
पक्षाची आढावा बैठक यशस्वी करण्यात कळंब विभाग चिटणीस पांडुरंग बदे,पुरोगामी युवक उपाध्यक्ष तथा पोशिर ग्रा.पं.सदस्य अनिल जोशी,पुरोगामी युवक खजिनदार महेश म्हसे,अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष बबन भालेराव,पोशिर ग्रा.पं.सदस्य दत्ता राणे,नितीन गायकर,प्रशांत म्हसे,गणपत भगत,जयवंत म्हसे आदिनी विशेष प्रयत्न केले.
--------------------------------------------------------------------------
बिरसा क्रांती दल संघटनेच्या दिंडोरी तालुका महिला अध्यक्ष पदी कविता ताई भोंडवे यांची नियुक्ती
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆
_जाहिराती साठी संपर्क साधा_
+91 7350334020
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆
----------------------------------------------------------------------------------



0 Comments
जय आदिवासी
जय जोहार