प्रतिनिधी :- दादाजी बागुल कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य
बिरसा फायटर्स बागलाण यांनी नायब तहसीलदार बहिरम साहेब यांना न्यूक्लिअस बजेट अंतर्गत आदिवासी बांधवांना रेशनकार्ड मिळावे यासाठी कागदपत्रे सादर करण्यात आले व निवेदन देण्यात आले
निवेदनात म्हटले आहे की
बागलाण तालुक्यातील आदिवासी समाज अजुनही अत्यंत मागासलेला आहे म्हणुन नुकतीच आदिवासी विकास विभागामार्फत न्युक्लियस बजेट योजनेअंतर्गत शासनाने आदिवासीसाठी मोफत जातीचे दाखले व रेशनकार्ड मिळावे अशी तरतुद केली आहे तरी आम्ही आपणास विनंती करतो की , सदर योजनेचा लाभ बागलाण तालुक्यातील प्रत्येक वंचित आदिवासीं ना मिळावा त्यासाठी आमची आदिवासी सामाजिक संघटना बिरसा फायटर्स आपल्याला सर्वोतपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध राहील व त्यासाठी सदर योजना तालुक्यातील प्रत्येक गावागावात आदिवासीपर्यंत पोहचविण्यासाठी बिरसा फायटर्स संघटना सहकार्य करेल जेणेकरुन एकही आदिवासी या योजनेपासुन वंचित राहणार नाही . म्हणुन सदर रेशनकार्ड यादि लवकरात लवकर पास करावी जेणे करुन पुढील यादी आपल्यासमोर सादर करु.
निवेदन देण्यासाठी दादाजी बागुल कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, नाशिक जिल्हा महासचिव उमाकांत कापडणीस, जिल्हा कार्याध्यक्ष विजय सहारे, बागलाण तालुकाध्यक्ष आकाश पवार, तालुका संघटक भाऊसाहेब माळी आदी उपस्थित होते

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार