By आदिवासी युवा
पिटेझरी विश्रामगॄहात अनुसुचित जमाती कल्याण समिती सदस्य- एस.एम.कोरोटेंशी सुरेशकुमार पंधरे प्रांताध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ शिष्टमंडळाची चर्चा
एसके जी. पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली:(२९आँक्टो) दि.२८/१० पासून तीन दिवस भंडारा जिल्हा दौर्यावर असलेली अनुसु जमाती कल्याण विधीमंडळ महाराष्ट्र राज्य समिती विविध अधिकारी कर्मचारी, आदिवासी विकासाचे अनुशेष भरून काढणे विकास आराखडा मागणे,भ्रष्ट अधिकाऱींना त्वरित निलंबित करने इतर मुद्दे घेवून महाराष्ट्रात फिरताहेत.
यात समिती अध्यक्ष दौलतराव दरोडा यांचे नेतॄत्वात आमदार सहषराम एम. कोरोटे ,डाँ.अशोक उईके राजकुमार पटेल, समितीत १२ विधान सभा सदस्य व ४ विधान परिषद सदस्य आहेत.
आज आश्रम शाळा तहसील,कॄषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,वनविभागक्षेञ आदिवासीं ना मिळणार्या योजनांची अमंलबजावणी करीत आहेत किंवा नाही याची जोरदार सखोल तपासणी एस टी डी सी समिती करीत आहे याविषयी चर्चा घडवून आणण्यास बिरसा फायटर्स च्या वतीने साकोली तालुक्यातील ९९ टक्के अनु जमाती संख्या असलेले पिटेझरी गावी निसर्गरम्य पहाडीवर,सदरिल गाव विकास व तेथील जनजीवन ,त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास कटीबध्द असतांना स्वातंञ्याच्या ७४ वर्षानंतरही मागासलेपणाचा डाग पुसला जात नाही.
म्हणुनच, अनु.जमाती कल्याण समितीने विविध,मुद्दे घेवून सरकारी दौरा सुरू केला आहे त्यात,समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक राजकीय योजनात हरताळ फासल्या जात आहे. बोगसांना संरक्षण देने सुरूच आहे. कोर्टाचे निर्णय लागुनही बोगसांना गोंजारले जात आहे. आदिवासीचे विकासात कार्यात खच्चीकरण केले जात आहे.आणि हेच समाजाचे हॄदय विदिर्ण करणारे सत्य आहे असे साहित्यिक विचारवंत सुरेशकुमार पंधरे यांनी आपले समुदयासमोर मत मांडले.
समाजाच्या विविध प्रश्न,समस्या "आ"वासून पुढे येत आहेत.सक्षम नेतॄत्व म्हणून अनु जमाती कल्याण समितीचे आदिवासी आमदार मा.एस एम कोरोटे यांचेशी चर्चा घडवून आणली व वन अँक्टमधील झरणारा तलावाविषयी सिंचन सुविधा मिळवून देण्यासंबंधी चर्चा केली
याप्रसंगी जिल्हा भंडारा कार्याध्यक्ष विनोद रमेशजी कंगाले,सत्यपाल मरस्कोल्हे उपसरपंच व तालुका,सं.प्रमुख अजित ऊईके,संघटक,सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील,उमराव भलावी,भोजराम भलावी धान्य दुकानदार, केवळराम उईके मा. वनपाल,तेजराम भलावी तंमुस अध्यक्ष,हेमराजजी मडावी सदस्य ग्रामपंचायत,आर वि मेश्राम प स शरद हलमारे, राजस्व निरिक्षक, मनिषा ऊईके तलाठी पिंडकेपार, राकेश टेकाम, गणेश कंगाले, व गावकरी हजर होते .

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार