By आदिवासी युवा
तामिळनाडूमध्ये राजा रावणाची ३५२ मंदिरे आहेत. सर्वात मोठी मूर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे छत्तीसगड मध्यप्रदेश झारखंड आणि महाराष्ट्रातही अमरावती जिल्ह्यातील मेळघाटसह सर्वत्र राज्य भर राजा रावणाची पूजा केली जाते.
अशा या महान राजाला इथल्या षड्यंत्रकारी व्यवस्थेने बदनाम करण्याचा कोणताच कसूर ठेवला नाही.खलनायक म्हणून प्रसिद्ध केले आहे.पंरतू सत्य लपून राहत नाही ते कधी ना कधी तरी उघड होतेच.आदिवासी समाजातील व इतरही समाजातील संशोधक साहित्यिक यांनी राजा रावण यांचा खरा इतिहास शोधून काढला व जगासमोर मांडला आहे.
रावण हे आदिम संस्कृतीचे श्रध्दास्थान व दैवत आहे.१९३० पासून त्याला जाळतात. त्यांच्या बद्दलचा राग द्वेष मत्सर व त्याला अपमानित उपरोधिक नावाने राक्षस संबोधून जाळतात. त्यामुळे आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात व येणाऱ्या पिढीमध्ये ही द्वेष मत्सराची व पेटवून देण्याची भावना कायम रूजून राहते.
समाजामध्ये शांती सुरक्षा भाईचारा समता न्याय बंधुता कायम ठेवण्यासाठी प्रत्येकांच्या धार्मिक भावना व देवा- देवतांच्या आदर्श महामानवांना वंदन करण्याच्या सन्मान करण्याचा संविधानिक अधिकार व स्वातंत्र्य आहे तेव्हा रावण दहन प्रथा बंद करावी व समस्त मूलनिवासी आदिवासी समाजाच्या भावनेचा विचार व्हावा.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार