By आदिवासी युवा
प्रतिनिधी: दादाजी बागुल बिरसा फायटर्स महाराष्ट्र
रत्नागिरी दिनांक 06 ऑक्टोबर 2021 रोजी बिरसा फायटर्स संघटनेतर्फे कुडावळे आदिवासीवाडी तालुका दापोली येथे आदिवासी कातकरी बांधवांना आवश्यक कपडे वाटप करण्यात आले. या कपड्यांत पुरूषांसाठी शर्ट ,पॅन्ट,महिलांसाठी साडी,परकर, मुलींचे ड्रेस,लहान मुलांचे ड्रेस,शालेय कपडे इत्यादी कपड्यांचा समावेश होता.
एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे कपडे वाटप करण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्स संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, बिरसा फायटर्स संघटनेच्या राज्य महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार, शिवाजी गोरे सामाजिक कार्यकर्ता ,शिवाजी पवार कुडावळे वाडी प्रमूख,वामन पवार,संदेश जाधव,दिलीप पवार,किसन पवार,जानू वाघमारे,सुभाष जाधव व कुडावळे आदिवासी वाडीतील 200 पेक्षा अधिक आदिवासी बांधव उपस्थित होते.
कपडे वाटपाचा कार्यक्रम कुडावळे येथील आदिवासी समाज मंदिरात घेण्यात आला.कुडावळे आदिवासी बांधवांनी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गोरे,सुशीलकुमार पावरा यांचे पुष्प देऊन स्वागत केले.वाडीतील प्रमुख बांधवांचा सुद्धा सुशीलकुमार पावरा व शिवाजी गोरे यांनी सत्कार केला.
एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे कपडे वाटप केले आहेत. हा बिरसा फायटर्स संघटनेचा हा महत्वाचा सामाजिक उपक्रम आहे.गरीबीमुळे आदिवासी बांधव अनेक जीवनावश्यक सुविधांपासून वंचित राहतात. त्यांची जीवनावश्यक गरज लक्षात घेऊन आम्ही हे कपडे वाटप केले आहेत.
असे सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी व्यक्त केले.कपडे वाटप केल्याबद्दल कुडावळे येथील आदिवासी बांधवांनी बिरसा फायटर्स संघटनेचे आभार मानले आहेत.
कथा,लेख,मनोगत, वाढदिवस,कविता,बातम्या व जाहिरातीसाठी मो.नं. 7350334020
💁♂️ 🪀WhatsApp करा 👇
https://wa.me/message/3E344UV57DDMB1

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार