By आदिवासी युवा
मा.अध्यक्ष/तथा एस.एम.कोरोटे अनु.जमाती कल्याण विधीमंडळ समिती सदस्य यांना सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्सचे निवेदन.
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
भंडारा (२८आँक्टो) तीन दिवसीय दौर्यावर अनुसुचित जमाती विधी मंडळ कल्याण समिती अध्यक्ष दौलतराव दरोडा यांच्या नेतॄत्वात भंडारा दौर्यात सदस्य / आमदार व बिरसा फायटर्सचे विदर्भप्रदेश उपाध्यक्ष एस एम कोरोटे यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशकुमार पंधरेंचे शिष्टमंडळाने आदिवासी प्रवर्गातील अधिकाऱी कर्मचारी पदभरती,अनुशेष आरक्षण पदोन्नती संदर्भात बोगसांचे विविध भरतीत झालेले अतिक्रमण दुर करने. निवेदन देत सविस्तर चर्चा घडवून आणली.
याप्रंसगी व्यंकट- सिंग खंडाते विदर्भ कार्याध्यक्ष, उत्तम कळपते माजी जि.परिषद सदस्य,आनंद मडावी जिल्हा उपाध्यक्ष,माजी प्राध्यापक वामनराव शेडमाके साहित्यिक,संजय पेंदाम जिल्हा सचिव,विठ्ठल मसराम सर, लिलाधर चांदेवार अध्यक्ष तुमसर, संतोष आर.कोकोडे,लाखनी गुरू पंधरे,परमेश वल्के धारगांव जि.प क्षेञ प्रमुख,सह रत्नदिप दहिवले सामाजिक कार्यकर्ते उपस्तीत होते.
निवेदनात
- सन २०१८-२०१९चे आपातकालीन अनुदान योजना अजुनही मंजुर दोन लांभार्थ्यांना मिळाले नाही.
- खावटी वाटपात १०० टक्के,अनुदान कुटुंबांचे सरसकट सर्वे करून खात्यावर पैसे जमा करन्याबाबत
- सन २०१९ चालक शिपाई पोलिस शिपाई भर्ती भंडारा बोगसांचे नावे हटवून त्यात खरे आदिवासीं पाञ यादीत समाविष्ठ करनेबाबत
- इंजिन मोटार पंप २०१६-२०१७ आर्थिक वर्षातील मंजुर लाभार्थ्यांना वाटप करणेबाबत,
- पीव्हीसी पाईप वाटप
- विद्यार्थ्यांचे स्काँलरशिप चे पैसे त्यांच्या खात्यावर मारण्या ची कार्यवाहीबाबत
- कोरोणा काळातील अनु जमाती कर्मचारी डाँक्टर,नर्स सरपंच,आशा वर्करचे पैसे त्यांच्या खात्यावर टाकण्याची कार्यवाहीबाबत,जे दगावले अशांना जिल्हा परिषद आपात कालीन निधीतून लाभ देण्याबाबत
- अनु सुचित जमातीच्या योजना राबवून विनाविलंब बंद असलेली व्यवस्था सुरू करण्यास तात्काळ पाऊले उचलून सदर समितिने संघटणा व पदाधिकार्याना संज्ञान व माहिती पुरवावी,
अशा आशयाचे विनंती मागणीचे पञ बिरसा फायटर्स शिष्टमंडळाने आज दिले.
विशेष म्हणजे यावर कोणती कार्यवाही होईल याविषयी उत्सुकता आहे. आदिवासी समितीत पंधरा आमदारात १२ विधानसभा सदस्य व ५ वि.परिषद सदस्य आहेत.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार