By आदिवासी युवा
प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर मोरे, मालेगाव
मालेगाव:- आज दिनांक 13/10/2021 रोजी आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालय कळवण मार्फत न्युक्लीयस बजेट योजनेद्वारे सन 2021--- 2022 प्रमाणे आदिवासींसाठी मोफत रेशनकार्ड व जातीचे दाखले लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात यावे या संदर्भात मालेगाव तहसिल कार्यालयास मालेगाव तालुका बिरसा फायटर्स तर्फे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, मालेगाव तालुक्यातील आदिवासी समाज अजुनही अत्यंत मागासलेला आहे म्हणून नुकतीच आदिवासी विकास विभागामार्फत न्युक्लियस बजेट योजनेअंतर्गत शासनने आदिवासीसाठी मोफत जातीचे दाखले व रेशनकार्ड मिळावे अशी तरतुद केली आहे.
तर आम्ही आपणास विनंती करतो की, सदर योजनाचा लाभ मालेगाव तालुक्यातील प्रत्येक वंचित आदिवासींना मिळावा त्यासाठी आमची आदिवासी सामाजिक संघटना बिरसा फायटर्स आपल्याला सर्वोतपरी सहकार्य करण्यास कटिबध्द राहिल व त्यासाठी सदर योजना तालुक्यातील प्रत्येक गावागावातील आदिवासीपर्यत पोहचविण्यासाठी बिरसा फायटर्स संघटना सहकार्य करेल.
जेणेकरुन एकही आदिवासी या योजनेपासून वंचित राहणार नाही म्हणून सदर रेशनकार्ड यादी लवकरात लवकर पास करावी जेणे करुन पुढील यादी आपल्यासमोर सादर करू.
तसेच निवेदन देण्यासाठी मालेगाव तालुकाउपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे बिरसा फायटर्स व मालेगाव तालुक्यातील आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार