बुद्धांचा धम्म बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मदीक्षेच्या दिशेने समाजाने गतिमान व्हावे.

 By आदिवासी युवा


बुद्धांचा धम्म बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मदीक्षेच्या दिशेने समाजाने गतिमान व्हावे.


मुन्नाभाई नंदागवळी : अनुवर्तनदिन व अनावरण सोहळा थाटात


गोदिंया :  तथागत बुद्धांनी सर्व प्रथम सारनाथ येथे पहिल्या पाच भिख्खू अनुयायांना प्रसार व प्रचार प्रवर्तन करण्यासाठी प्रवचन केले तेच खरे धम्मचक्र प्रवर्तन आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मदीक्षा दिली व धर्मांतर केले, ती एक रक्ताविना ऐतिहासिक क्रांती आहे. हे अनुवर्तणीय दीन सोहळा असावा. म्हणूनच  बुद्धांचा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मदीक्षेच्या दिशेने आपण सर्व उपासक व अनुयायांनी गतिमान व्हावे. असे समतेचे प्रतिपादन आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मुन्नाभाई नंदागवळी यांनी व्यक्त केले. ते ईसापुर गावातील महाकारुणिक तथागत बुद्ध व महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाच्या अनावरण सोहळा प्रसंगी बोलत होते.


यावेळी सोहळ्याचे उद्घाटन ब्रम्हपुरीचे आंबेडकरी विचारवंत प्रा. डाॅ. युवराज मेश्राम यांनी करून वडसा येथील सेवानिवृत्त अभियंता विजय मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली अतिथी पुनाराम जगझापे, माजी प्राचार्य माटे, उमाकांत ढेंगे, अभिमण लोणारे, जनार्धन गेडाम,  माणिक गोंडाणे, गणपत गोंडाणे आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या आगमणाने झाले, निळा ध्वज ध्वजारोहण करून झाली. नंतर तथागत बुद्धांच्या पुतळ्यास मालार्पण व अभिवादन करुन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाचे अनावरण करण्यात आले आहे व अभिवादन केले. प्रसंगी मान्यवरांचे सत्कार व सन्मान करण्यात आले. सम्यक बौद्ध विहार समिती इसापूर यांनी  दुपारी 0२.०० वाजता आयोजन केले होते.

अनावरण सोहळ्यानिमित्त भोजनदान वाटप करण्यात आले. 


पुढे बोलताना नंदागवळी म्हणाले- धम्म घराघरात पोहचले पाहिजे व ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजातील नागरिकांना हक्क व अधिकार मिळवून दिले, त्याची परतफेड समाजाने करावी. तरच खरे धम्मचक्र प्रवर्तन होईल असे प्रामाणिक विचारही मांडले. 


अनावरण सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लोणारे यांनी करून आभार विवेक गोंडाणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मच्छिंद्र गोंडाणे, गेडाम, मेश्राम, लोणारे, रामटेके व समाजातील महिला, पुरुष व तरुणांनी सहकार्य केले.





Post a Comment

0 Comments

झाले