प्रतिनिधी :- दादाजी बागुल
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला हमखास दोन बक्षीस मिळतात एक म्हणजे विरोध तर दुसरे म्हणजे टीकाटिपणी तरीसुद्धा आदिवासी समाजातील समाज बांधव *माननीय श्री वसंतराव

गवळी साहेब यांना भारत विकास प्रबोधनी प्रकाशन कल्याण आणि मुरली फार्म अंतापुर यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय श्री शंकर महाराज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले होते. त्यामुळे आदिवासी पगारदार सहकारी सोसायटी व आदिवासी ऐकतेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.* त्याच प्रमाणे करोना संसर्गाच्या परिस्थितीत कोरोना युद्ध म्हणून आरोग्य सेविका मोठ्या आशेने काम करत होते. त्यामध्ये मोठ्या सिंहाचा वाटा होता *आपल्या आदिवासी पूजा ताईंचा म्हणून दैनिक लोकमंथनच्या वतीने त्यांना कोरोना युद्ध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आले.*
गवळी साहेबांनी बोलताना सांगितले की प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जीव लावणारे आयुष्य घडवणारी व्यक्ती मिळत असतात. त्यापैकी एक आपला आदिवासी समाज आहे. समाज एकत्रित येत असतो तेव्हा एक शक्ती, ऊर्जा निर्माण होत असते शब्द,प्रेम, प्रेरणा, यश ,नाते हे आयुष्यभर मनात जपणारी भावना निर्माण करणारे आहेत. सर्व शब्दांचे मोल हे जपले की आपुलकीची भावना निर्माण होते. आणि आयुष्य अनमोल होते. त्यामुळे एकत्रित राहा सुखी राहा. असे सांगत आपल्या भावना व्यक्त केली यावेळी *प्रमुख पाहुणे म्हणून पंडित ठाकरे, दीपक ठाकरे, शिवाजी कोल्हे, भारत सूर्यवंशी, मोहन जगताप* इ. उपस्थित होते.या प्रसंगी आदिवासी पगारदार सहकारी सोसायटी जमा रक्कम वाटप व व्याज याविषयी चर्चा करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे श्री. कैलास चौरे यांनी केले तर उपस्थित समाजबांधवांचा आभार देवा सोनवणे सर यांनी मानले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार