By आदिवासी युवा
( डॉ.संजय दाभाडे ( Dr. Sanjay Dabhade ) पुणें , 9823529505 ).
सोमवार, १८ ऑकटोबर २०२१
कोळशाच्या महाप्रचंड खाणींना छत्तीसगड च्या अति घनदाट हंसदेव जंगलांत परवानगी दिली जातं आहे. हंसदेव जंगलं एक लाख सत्तर हजार हेक्टर जमिनीवर पसरलं आहे.
अदानीला त्याचा हिस्सा आंदण दिला जातं आहें. सगळ्या राज्यकर्त्यांकडून. जल , जंगलं जमीन ,आदिवासी आणि पर्यावरणाला उध्वस्त करण्याचे सुरु झाले आहे.
२०१० ला जयराम रमेश ( युपीए २ ) ह्यांनी ह्या इलाख्याला ' नो गो झोन ' म्हणून घोषित केलें होतें. म्हणजे तिथं खाणींना परवानगी दिली जाणारं नव्हती. परंतु नंन्तर ती घोषणा रद्द झाली.
छत्तीसगड मध्यें १५ वर्षे भाजपची सत्ता होती नी त्यांनी सगळे कायंदे गुंडाळून अदानी च्या खाणींना परवानग्या देणं सुरू केलं.
वन हक्क कायदा २००६ , पेसा कायदा १९९६ व संविधानिक ५ व्या अनुसूचीचे उल्लंघन करून आदिवासींना त्यांच्या हक्कांपासून परागंदा करणं सुरु आहे.
आदिवासी ग्रामसभांच्या बनावट परवानग्या देखील घेतल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे.
सध्या छत्तीसगड मध्यें काँग्रेसचं भूपेश बाघेल सरकार आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस ने व खुद्द राहुल गांधींनी तिथं सभा घेऊन जाहीर केलं होतं कि त्या परिसरात खाणींना परवानगी दिली जाणार नाही. तो एक महत्वाचा निवडणूक मुद्दा काँग्रेसने केला होता. परंतु काँग्रेस सत्तेत आल्यावर तें सर्व विसरली.
आता आदिवासी ना काँग्रेस विचारतं देखील नाही हे.
अखेरीस संविधान हातात घेऊन हंसदेव जंगल बचाव लॉन्ग मार्च आदिवासींनी काढला व शेकडो आदिवासी आता राजधानी रायपूर ला पोहोचली असून तिथं आता आंदोलन सुरू आहे.
इकडं कोळसा तुटवडा , वीज केंद्र बंदच्या बातम्या सुरु झाल्या आहेत.
म्हणजे जास्तीत जास्त कोळसा खाणींना परवानग्या देण्याची पार्श्वभूमी तयार केली जातं आहें.
आणखी प्रदूषणाच्या निमित्त करून व पेट्रोल दरवाढ ह्या कारणांमुळे इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केटिंग जोरात सुरू झालें आहे.
वाहने विजेवर चालणार असतील तर किती वीज ज्यादाची लागणार नी ती कुठून येणार ह्याच्याशी कुणाला देणं घेणं नाहीहे.
भारतात मोठ्या प्रमाणात कोळशापासून वीज निर्मिती होतें .....आता आणखी जास्त मागणी वाढेल......नी उद्धवस्त होणार जल , जंगलं जमीन ,आदिवासी आणि पर्यावरण.....
पण त्याची पर्वा कोण करणार .....?
हवामान बिघडतं , महापूर आले की तेवढ्यापुरता पर्यावरच्या नी ग्लोबल वार्मिंग च्या चर्चा रंगतात पण मुळातील मुद्दे मात्र पूर्णपणे दुर्लक्षित होतात. माध्यमांना तर ह्याचे काही सोयरसुतक असतं नाहीं.
सरकारे नी भांडवलदारांचे तर साटेलोटे आहे नी आदिवासी नी पर्यावरण घोर संकटात आहेत.
हें असेंच घडतं आले आहे .....
आदिवासी एकटेच आहेत जें ह्याविरुद्ध सतत लढ्त राहीले आहेत .....
लढत राहणार आहेत.....!
डॉ.संजय दाभाडे , ( Dr.Sanjay Dabhade ) पुणें , 9823529505
कथा,लेख,मनोगत, वाढदिवस,कविता,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा मो.नं. 7350334020 हा नंबर आदिवासी युवा या नावाने सेव करून ठेवा व आपल्या ग्रुप ला जाॅईन करा🙏
💁♂️ 🪀WhatsApp करा 👇
🏹आदिवासी युवा🚩
https://wa.me/message/3E344UV57DDMB1
वरील बातमी What's app, Facebook, Twitter, YouTube, Instagram वर शेअर करुन बातमी आपल्या मित्रांना पाठवा.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार