चालक पोलिस शिपाई भरती भंडारा २०१९ लेखी परिक्षेतील एसटी प्रवर्गातून बोगसांचे नावे वगळण्यात यावे - बिरसा फायटर्स

By आदिवासी युवा 

एसटी प्रवर्गातून बोगसांचे नावे वगळण्यात यावे - बिरसा फायटर्स


मा.मुख्यमंञी व गॄहमंञी यांनी भंडारा शिपाई भरतीत खऱ्या एसटीं परिक्षार्थींना घेण्यात यावे . बिरसा फायटर्सचे निवेदन सादर

प्रतिनिधि:- एस. के. जी पंधरे -.विदर्भ  चिफ


एसटी प्रवर्गातून बोगसांचे नावे वगळण्यात यावे - बिरसा फायटर्स

साकोली (११) राज्यात भंडारा चालक पोलीस शिपाई भरती २०१९ च्या जिल्ह्यात परिक्षेत पाञ यादीत बोगस गैर आदिवासीचे नावे आल्याने ते वगळून खरे प्रतिक्षा यादीतील परिक्षार्थींना घेण्यात यावे या आशयाचे पञ निवेदन   मुख्यमंञी, गॄह मंञी, यांना बिरसा फायटर्स सुप्रिमो व अध्यक्ष विदर्भ  सुरेशकुमार पंधरे व जिल्हाध्यक्ष पी बी कंगाले यांचे नेतॄत्वात दिले.


भंडारा वार्तापञ जा/ ज सं कक्ष पो अ का भंडारा यांचे दि. ५/१०/ २१ ची प्रसिध्द यादीचे अवलोकन केले असता तिथे अनु.जमाती चे ३२ परिक्षार्थी असलेल्या यादीत १५ गैर आदिवासी निदर्शनात आले आहेत.हे सर्व गोवारी एसबिसी प्रवर्गाचे असून ही जात एस.टी. प्रवर्गात मोडत नाही हे स्पष्ट आहे. मा सर्वोच्च न्यायालय याचिका क्र.४०९६)२०२० ४०१८/२०२० - ४१०१/२०२० निर्णय दि १८-१२. २०२९ अन्वये गोवारी जातीचे व्यक्तींना एस टी प्रवर्गाचे लाभ काढून टाकण्यात आले आहे.


त्यामुळे त्यांना लाभान्वित केल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अवमानना होईल.व पर्यायाने एसटी खरे गुणवत्ताप्राप्त परिक्षार्थीवर अन्याय होईल.शासन व सुप्रिम कोर्टाचे निर्णयाचे आदेश लक्षात घेता प्रक्रिया पारदर्शक झालेली दिसत नाही


सदर बाब गॄह विभाग तथा  पोलीस विभागाशी संबंधीत असल्याने लक्षात आनुन देत आहोत.कॄपया तक्रारीचे निवारण करून गोवारी परिक्षार्थींना एसटी प्रवर्ग पाञता यादीतून वगळण्यात यावे.व प्रतिक्षेतील विद्यार्थींना न्याय देत निवड करावी असे पण आज उपविभागीय अधिकारी साकोली मार्फत बिरसा फायटर्सने निवेदन दिले आहे.



मा मुख्यमंञी,साहेब यांना नागपूर महापालिका अंतर्गत गोंड वस्त्याचे नावे बदलू नये- सुरेशकुमार पंधरे, बिरसा फायटर्सचे निवेदन


बोरविहीर तालुका जिल्हा धुळे येथे एकलव्य भिल्ल समाज संघटनेची एक बैठक पार पडली. 


 बिरसा क्रांती दल संघटनेच्या आंबेगाव तालुका महासचिव पदी मा.विनायक बाळशिराम धादवड व कोषाध्यक्ष पदी मा.विलास (बुवा) लाडके यांची नियुक्ती


कथा,लेख,मनोगत, वाढदिवस,कविता,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा  मो.नं. 7350334020 

💁‍♂️ 🪀WhatsApp करा 👇

        🏹आदिवासी युवा🚩 

 https://wa.me/message/3E344UV57DDMB1




Post a Comment

0 Comments

झाले