शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभार विरोधात आज दि.10/11/2021 रोजी तहसिलदार सो शिंदखेडा यांना निवेदन देण्यात आले

 By आदिवासी युवा




भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य

शिंदखेडा आज दि.10/112021 रोजी ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभार विरोधात तहसिलदार सो शिंदखेडा यांना निवेदन देण्यात आले. 




निवेदनात,

शिंदखेडा हे तालुक्याचे ठिकाण आहे येथील ग्रामीण रुग्णालयात 42 खेडे आहेत परंतु रात्री बेरात्री पेशंट गेल्यावर कुठलीही आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही डॉक्टर थातूरमातूर इलाज करून पेंशन्ट धुळ्याला पाठवतात परंतु अंबुलन्स असते तर डायवर नसतो. 




सात तारखेला रात्री साडेअकरा वाजता गरोदर महिला रक्तस्राव सुरू होत असताना तीन ते चार तासापर्यंत गरोदर आदिवासी महिला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात  पडून होती  डॉक्टर कुंदर वाघ हे यांनी पेशंटला धुळे घेऊन जा असे सांगितले  परंतु पेशंटला घेऊन जाण्यासाठी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दोन अंबूलस असून सुद्धा या आदिवासी गरोदर महिलेला देण्यासाठी नकार दिला.  




शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर काटे यांना फोन लावल्यास काटे साहेब सागता की आमच्याकडे ड्रायव्हर नाही शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात अधीक्षक काटे राहत नाही  यांना फोन लावल्यास काटे साहेब उडवाउडवीचे उत्तर देतात एक आदिवासी गरोदर महिलेला दोन ते तीन तास शारीरिक इजा झाली व मानसिक त्रास दिला गेला म्हणून शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक काटे यांच्यावर आदिवासी पेशंट असल्यामुळे भेदभाव केला म्हणून अनुसूचित जनजाति एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. 


ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे एमरर्जेंसी साठी अंबुलन्स ड्रायव्हर 24तास हजर राहावे. अशी सोय करण्यात यावी 108 अंबुलन्स आल्यावर तेथे पण डॉक्टर उपलब्ध असावेत


म्हणून शिदखेडा  रुग्णालयात घोगाळ कारभार सुरू आहे याच्यावर तात्काळ लक्षात घेऊन सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व गोरगरीब लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात यावी 

नाहीतर आमच्या आदिवासी संघटने मार्फत आंदोलन सतत सुरू राहील 


दिपक अहिरे

संस्थापक अध्यक्ष भिल समाज विकास मंच 

नगरसेवक शिंदखेडा नगर पंचायत



अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO




Post a Comment

0 Comments

झाले