प्रतिनिधी :- दादाजी बागुल बिरसा फायटर्स
दि.३१ ऑक्टोबर रोजी निर्धार सामाजिक संस्था कामोठे यासामाजिक संस्थेने कर्जत तालुक्यातील नांदगाव हया दुर्गम भागातील डामसेवाडी येथे दिवाळी फराळा सह,कपडे,शैक्षणिक साहित्य,धान्यादी माल,आकाश कंदिल वाटप करून दिवाळी साजरी
*निर्धार सामाजिक संस्था हि निराधारांना आधार या तत्वावर काम कसणाऱ्या संस्थेने कोरोना महाभयंकर महामारीत अनेकदा गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे.निर्धार संस्था निराधार,अंध -अपंग, गरीब,गरजू,दिन दुबळ्यांसाठी काम करणारी संस्था म्हणून ओळखली जात आहे.निर्धार संस्थेने यापुर्वी पनवेल खालापूर,अंबरनाथ,नवीमुंबई,सहकर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी मदत करून आधार देण्याचे महान कार्य केलेले आहे. त्यातच सामाजिक कार्याची विशेष आवड असणारे कर्जत तालुक्यातील रा.जि.प.प्राथमिक शाळा गिरेवाडीचे शिक्षक वसंत ढोले सर यांनी निर्धार सामाजिक संस्थेचे निलेश आहेर सर,अनिल कुंभार सर यांच्याकडे दिपावली निमित्त डामसेवाडी येथे यावर्षी दिवाळी फराळ वाटप उपक्रमा विषयी मागणी केली असता निर्धार संस्थेने आज रोजी दिवाळी फराळासह,कपडे,शैक्षणिक साहित्य,धान्यादी माल,आकाश कंदिल देऊन आदिवासी वाडीत दिवाळी,भाऊबीज साजरी केली*
*यावेळी निर्धार सामाजिक संस्थेने लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ लिंबू चमचा,बादलीत चेंडू टाकणे,प्रश्नमंजुषा घेऊन मुलांना बक्षिस,खाऊ देऊन मुलांनाही हर्षभरीत केले*
*या प्रसंगी निर्धार सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मा.अनिल कुंभार साहेब,शुभम वाळके साहेब,कमलेश पाटील साहेब,रोहीत पाटील साहेब,निलेश आहेर साहेब,सुरेश झोरे साहेब,आदिवासी
ठाकूर समाज अध्यक्ष भरत शिद साहेब,कर्जत नोकरवर्ग संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय हिंदोळा सर,वसंत ढोले सर,मा.उपसरपंच राम खंडवी, मुंकूद हिंदोळा,आनंता खंडवी,गोपीनाथ गावंडा,यशवंत बांगारा आदि.प्रमुख उपस्थित होते*




0 Comments
जय आदिवासी
जय जोहार